ऑस्ट्रेलियन गुंतवणूक सल्लागार शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पात गुंतवणूक करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




मुंबईदि.21 : राज्यात विविध विकासात्मक प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. उद्योग विस्तारासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारण्यात राज्य अग्रेसर आहे. राज्यातील या विकासात्मक प्रकल्पांमध्ये ऑस्ट्रेलियन गुंतवणुकदारांनी गुंतवणूक करावीअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत ऑस्ट्रेलियन गुंतवणूक सल्लागार शिष्टमंडळाची बैठक वर्षा निवासस्थानी पार पडलीत्यावेळी ते बोलत होते.
ऑस्ट्रेलिया देशातील गुंतवणुक सल्लागार मंडळाने राज्यात गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली असून यासंदर्भात चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ राज्यात भेटीसाठी आले आहे. या बैठकीला ऑस्ट्रेलियाचे महावाणिज्यदूत टोनी हुबरमुख्य गुंतवणूक अधिकारी डॅमियन ग्रॅहमगुंतवणूक नियोजन प्रमुख डॅमियन लिलिक्रॅपइमेर्जिंग मार्केटच्या  व्यवस्थापिका श्रीमती कॅरोलिन गोरमननॉन कोर मार्केटच्या व्यवस्थापिका श्रीमती एमिली फंग यांच्यासह इतर सदस्य तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणीउद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळेराजशिष्टाचार विभागाचे सहसचिव सतीश जोंधळे उपस्थित होते.
 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेपरकीय गुंतवणुकदारांची पसंती महाराष्ट्राला आहे. देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक ही राज्यात होते. निर्यात क्षेत्रातही राज्याचे काम उल्लेखनीय आहे.राज्याची बॅलन्सशीट मजबूत असल्याने राज्यात होणारी परकीय गुंतवणूक सुरक्षित आहे असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना दिला.
राज्यात सध्या सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावासह सेवा क्षेत्रातही गुंतवणुकीला भरपूर वाव असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच राज्यात मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे बाधण्याचे लक्ष असल्याने गृहनिर्माण क्षेत्रातही गुंतवणूक फायदेशीर आहे. तसेच ऊर्जा व या क्षेत्रातील पुनर्वापर या क्षेत्रातही गुंतवणूक करण्यास मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याने 2025 पर्यंत ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट ठेवले असून सध्या राज्यातील गुंतवणुकीसाठी योग्य काळ असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
 चार वर्षातील प्रमुख उपलब्धींबद्दल ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेराज्यातील पायाभूत सुविधांमध्ये खूप मोठी भर पडली आहे. 300मीटर लांबीची मेट्रोकोस्टल रोडट्रान्स हार्बरलिंकनवीन विमानतळ यासारख्या मुंबईतील कामांमध्ये 20 बिलियन डॉलरची गुंतवणूक झाली असून राज्यातही मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. याशिवाय जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी प्रकल्पाने राज्यातील 25 हजार गावे पाणीदार झाली आहेत. यामुळे राज्यातील दुष्काळी समस्येवर मात करता आलीअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
0 0 0

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती