Tuesday, September 11, 2018

आर्चरी रेंज, तरणतलावासह साकारणार सुसज्ज जिल्हा क्रीडा संकुल संकुलाच्या कामाला गती द्यावी - जिल्हाधिकारी अभिजित बांगर



अमरावती, दि. 11 : जिल्हा क्रीडा संकुलासाठी 8 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. संकुलाच्या उभारणीच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले.
            जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            श्री. बांगर म्हणाले की, जिल्ह्यात आर्चरी क्रीडाप्रकारातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाची आर्चरी रेंज 1 कोटी 46 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणार आहे. संकुलातील जलतरण तलावाचे काम दर्जेदार व्हावे, तसेच त्यानंतर त्याची स्वच्छता व वापर चांगला असावा. संकुलाचे इस्टिमेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्काळ तयार करुन घ्यावे. विविध विभागांची नाहरकत प्रमाणपत्रे तत्काळ प्राप्त करुन घ्यावीत.
       जिल्हा वार्षिक योजनेतील व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजनेत निम्न पेढी प्रकल्पांतर्गत पुनर्वसित गावांचा समावेश करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
         संकुलात ॲस्ट्रोटर्फ हॉकी मैदान, बॅडमिंटन, ज्युदो, कुस्ती, फिटनेस सेंटरसाठी सभागृह, क्रीडा वसतिगृह, स्केटिंग रिंग, खो- खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यासाठी प्रमाणित क्रीडांगणे, ग्रीन जीम, योगा सेंटर व उद्यानाची उभारणी करण्यात येणार आहे, असे श्री. जाधव यांनी यावेळी सांगितले.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...