Thursday, September 20, 2018

होमगार्डच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक - डॉ. रणजित पाटील


मुंबई, दि. 19 राज्यातील होमगार्ड यांच्या मागण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.
मंत्रालय येथील श्री. पाटील यांच्या दालनात होमगार्ड यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी होमगार्डचे महासंचालक संजय पांडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
होमगार्डसना पोलिसांप्रमाणे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत आहे. तसेच होमगार्ड यांचे दैनंदिन कर्तव्य हे ऑनलाईन केल्यामुळे कामकाजात पारदर्शकता आली असून सर्व होमगार्डसना नियमाप्रमाणे काम मिळणे शक्य झाले आहे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...