Wednesday, September 5, 2018

ज्वलनशील रासायनिक पदार्थ बेकायदा साठवणूक करणाऱ्या विरुध्द गुन्हे दाखल करा - प्रविण पोटे पाटील


मुंबईदि. 4 : औद्योगिक परिसरात ज्वलनशील रासायनिक पदार्थ बेकायदेशीररित्या साठवणूक करणाऱ्या विरुध्द गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरण राजयमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी दिले.
तारापूरजि. ठाणे औद्यौगिक वसाहतीतील विविध प्रश्न आणि माणगावजि.रायगडच्या पास्को स्टिल कंपनीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. श्री. प्रविण पोटे पाटील म्हणाले,तारापूर औद्योगिक क्षेत्रात अनेक रासायनिक कंपन्या आहेत. रासायनिक पाणी नदी आणि समुद्रात सोडल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. मच्छिमारांकडूनही अनेक तक्रारी येत असल्याने अशा कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करावी. काही ठिकाणी जुन्या पाईप लाईन आहेत. त्याद्वारे प्रदूषित पाणी नागरी वस्तीत येत असल्याने त्या कायमस्वरुपी बंद कराव्यात.
औद्योगिक परिसरात अंधाराचा फायदा घेऊन रासायनिक पाण्याचे टँकर नदी-नाल्यात सोडतात. त्यामुळे पाणी प्रदूषित होत आहे. असे टँकर पोलीसांच्या मदतीने पकडून त्या कंपन्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. औद्योगिक परिसरात जादा प्रकाश देणारे दिवे लावणेसी.सी.टि.व्ही. लावणेनागरिकांच्या तक्रारीवर कारवाई करणे,ज्वलनशील पदार्थ ठेवल्याच्या जागेची सुरक्षितता तपासणे आदी बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
आतापर्यंत सांडपाण्याचे योग्य नियोजन न करण्याऱ्या 16 कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली असून 18 कारखान्यांना उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तारापूर औद्योगिक वसाहतीत एकुण 1138 कारखाने आहेत.
या बैठकीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी मधुकर लाडसहायक सचिव (तांत्रिक) पी. के. मिरासेमुख्य अभियंता श्री. सोंजे उपस्थित होते.
पॉस्टो स्टिल कंपनीला नोटीस
सांडपाणी नदीत सोडल्याने नागरिकांच्या तक्रारीवरुन माणगाव औद्योगिक परिसरात पॉस्टो स्ट‍िल लि. कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस दिल्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. हवेतील प्रदूषणामुळे या भागातील लोकांना खोकलादमाश्वास घेण्याबाबतचा तक्रारी वाढल्याने या कंपनीविरुध्द कडक कारवाई करण्याचे निर्देश श्री. पोटे पाटील यांनी दिले. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. के. सांळुकेउप प्रादेशिक अधिकारी सागर औटीअवर सचिव संजय संदनशिव आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...