Monday, September 17, 2018

महाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना 10 ‘राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’ प्रदान




नवी दिल्ली, 17 :  औद्योगिक सुरक्षाउत्तम पायाभूत सुविधा निर्माण करणा-या महाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना 10 ‘राष्ट्रीय सुरक्षा पुरस्काराने’ केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष गंगावार यांच्याहस्ते  गौरविण्यात आले.           
येथील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात केंद्रीय कामगार आणि  रोजगार मंत्रालयाच्यावतीने आज विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधत वर्ष २०१६ चे विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार’ आणि राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले. यावेळी सचिव हरीलाल सावरियासहसचिव अनुराधा प्रसाद तसेच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी विविध श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात  आले. महाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना एकूण 10 राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
2.5 लाख श्रम तासांपेक्षा अधिक व 5 लाख श्रम तासांपर्यत काम करणा-या औद्योगिक कंपनीच्या श्रेणीमध्ये पुणे येथील सनसवाडी भागातील कुपर स्टँडर्ड ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमीटेड ही कंपनी विजेती ठरली तर श्रेणीमध्ये ठाणे जिल्हयातील भिवंडी येथील गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरींग कंपनी लिमीटेड ही कपंनीही  विजेती ठरली असून आज या संस्थांना  राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अपघात मुक्त वर्षाच्या आधारावर 2.5 लाख श्रम तासांपेक्षा अधिक व 5 लाख श्रम तासांपर्यत काम करणा-या श्रेणीमध्ये रायगड जिल्हयातील तळोजा एमआयडीसी भागातील एसकेएम स्टील्स लिमिटेड विजेती कंपनी ठरली आहे या कपंनीस आज पुरस्काराने गौरविण्यातआले.
अपघात मुक्त वर्षाच्या आधारावर 1 लाख श्रम तासांपेक्षा अधिक व 2.5 लाख श्रम तासांपर्यत काम करणा-या कंपनीच्या श्रेणीमध्येही पुणे येथील सनसवाडी भागातील कुपर स्टँडर्ड ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमीटेड विजेती ठरली आहे याच श्रेणीमध्ये ठाणे जिल्ह्यातील भिंवडी येथील गोदरेज एण्ड बॉयस मैन्यू कपंनी विजेती ठरली आहे. या कपंनीना आज राष्ट्रीय सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
50 हजार श्रमतांसापेक्षा अधिक व 1 लाख श्रम तासांपर्यंत काम करणा-या संस्थाच्या श्रेणीमध्येही रायगड जिल्हयातील तळोजा एमआयडीसी भागातील एसकेएम स्टील्स लिमिटेड विजेती कंपनी ठरली असून यासाठीही या कंपनीला पुरस्कार प्रदान करण्यात आले. याच श्रेणीमध्ये या श्रेणीमध्येच नागपूर येथील बुटीबोरी भागातील रिलायंस सिमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड उपविजेती ठरली असून पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले.
अपघात मुक्त वर्षाच्या आधारावर तसेच 5 लाख श्रम तासांपेक्षा अधिक आणि 10 लाख श्रम तासांपर्यंत काम करणा-या कंपनींच्या श्रेणीमध्ये रायगड जिल्हयातील रोहा तालुक्यातील अमडोशी येथील सुप्रीम पेट्रोकेमिकल लिमीटेड कंपनीला याच श्रेणीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वळुंजगंगापूर येथील गरवारे इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनीही उपविजेती ठरली आहे. या कंपनीसही पुरस्काने सन्मानित करण्यात आले.
5 लाख श्रम तासांपेक्षा अधिक आणि 10 लाख श्रम तासांपर्यंत काम करणा-या कंपनींच्या श्रेणीमध्ये रायगड जिल्ह्यातील रोहा येथील सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड कंपनी तसेच या श्रेणीमध्येच  औरंगाबाद जिल्ह्यातील वळुंज येथील गरवारे पॉलिस्टर लिमिटेड ही कंपनी उपविजेता ठरली आहे या औद्योगिक संस्थाना आज पुस्काराने सन्मानित करण्यात आले.
आज दिलेल्या पुरस्कारांमध्ये प्रमाणापत्र व रोख रकम होती. रोख रकम कपंनींच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...