Friday, September 28, 2018

शिर्डी श्री साईबाबा विश्वस्त संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटींचा धनादेश


मुंबईदि. 28 : शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आज पाच कोटींचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे सुपुर्द केला.
यावेळी जलसंधारण मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदेसामान्य प्रशासन राज्य मंत्री मदन येरावारमुख्य सचिव दिनेशकुमार जैनमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणीसंस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
0 0 0

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...