सांसद आदर्श ग्राम योजनेतील कामांना गती द्यावी - जिल्हाधिकारी अभिजित बांगर




अमरावती, दि. 25 : सांसद आदर्श ग्राम योजनेतील कामांच्या उद्दिष्टानुसार वेळेत कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले.
रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या कार्यालयाच्या प्रतिनिधींसमवेत सांसद आदर्श ग्राम योजनेबाबत जिल्हाधिकारी  कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.
            आमला, नांदेडा खुर्द, टिमटाळा, ऋणमोचन, समरसपूर, खिरसाना, निरसाना, जनुना, जसापूर, कासरा आदी 10 गावांतील कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. योजनेतील काही कामे अद्यापही प्रलंबित आहेत. ती तत्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. भातकुली व नांदगावमधील सिंचन विहीरींची अद्ययावत माहिती सादर करावी. शाळांच्या इमारतींच्या प्रस्तावांचा समावेश व्हावा. जमीनीची उपलब्धता, परिसराची भौगोलिक रचना आदी लक्षात घेऊन नियोजन करावे व रस्ते, सिंचन विहीरी, शाळा इमारती, क्रीडांगण आदी कामांसाठी उद्दिष्टे निश्चित करावेत. महावितरणच्या कामांचाही प्रभावी फॉलोअप व्हावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी यावेळी केल्या.
नियोजन,जिल्हा परिषद, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रीडा आदी विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती