‘ईईएसएल’कडून पाच इलेक्ट्रिक वाहनांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पी.डब्लू.डी.ला हस्तांतरण राज्य शासन एक हजार इलेक्ट्रिक वाहने घेणार




मुंबईदि. 25 : भारत सरकारच्या ऊर्जा खात्यांतर्गत येणाऱ्या एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या सार्वजनिक उपक्रम कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या पाच इलेक्ट्रिक कारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले. 
मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदेपशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर,कामगार मंत्री संभाजीराव पाटील -निलंगेकरराज्यमंत्री सदाभाऊ खोतप्रवीण पोटे पाटीलप्रधान सचिव मनोज सौनिकसचिव (बांधकामे) अजित सगणेईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार आदी उपस्थित होते.
यानिमित्ताने मंत्रालयामधे दोन चार्जिंग स्टेशन्स बसविण्यात आले असून नागपूरमध्ये दोन चार्जर्स बसविण्यात येणार आहेत. याद्वारेराज्यातील ई-मोबिलिटीला उत्तेजन मिळावे यासाठी सहाय्यकारी ठरणार आहे.  पाच मोटार इलेक्ट्रिक कार हा पहिला संच असून पुढील काळात ईईएसएलकडून टप्प्याटप्प्याने राज्य शासन एक हजार इलेक्ट्रिक वाहने भाड्याने घेणार आहे.
राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व ईईएसएल यांच्यात 3 मे 2018 रोजी इलेक्ट्रिक वाहने भाड्याने घेणे आणि राज्य सरकारच्या कार्यालयांमध्ये ईव्ही चार्जर्स स्थापन करण्यासंबंधी सामंजस्य करार झाला. तसेच महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने तसेच त्याच्या सुट्या भागांची निर्मितीजोडणी उद्योग व चार्जिंग साधनांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी या क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणानुसार हा करार करण्यात आला होता. इलेक्ट्रिक वाहनांसाठी महाराष्ट्र राज्य हे जागतिक पातळीवर स्पर्धात्मक ठिकाण ठरावे आणि इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करत त्यांना प्रोत्साहन देतानाच त्यांच्यासाठीच्या सुट्या भागांच्या उत्पादनालाही चालना मिळावीया हेतूने या वर्षी राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहने आणि संबंधित पायाभूत सुविधा धोरण जाहीर केले होते.
            केंद्र सरकारचे ई-मोबिलिटी व्हिजन सक्षम करण्याच्या दृष्टीनेसरकारच्या विविध कार्यालयांमध्ये वापरली जाणारी पाच लाख पेट्रोल/डिझेलवरील वाहनांच्या जागी इलेक्ट्रिक वाहने आणण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या राज्यांमध्ये ईलेक्ट्रिक वाहने तैनात करण्यात आली आहेततिथे ईईएसएलने चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधाही स्थापित केल्या आहेत. 
००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती