Wednesday, April 13, 2022

नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरतीसाठी एजन्सीकडून अर्ज मागविले

 

नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरतीसाठी

एजन्सीकडून अर्ज मागविले

अमरावती, दि.13: राज्यातील नागरी सहकारी बँकामधील पदांची नोकरभरती प्रक्रिया राबविण्यासाठी सहकार विभागातर्फे एजन्सीजची नामतालिका (पॅनल) तयार करण्यासाठी नागरी सहकारी फेडरेशकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी पात्र संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन सहायक सहकारी संस्था निबंधक (प्रशासन) भालचंद्र पारिसे यांनी केले आहे.  

आवश्यक निकष

            संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत नोंदणीकृत असावी. संस्थेस किमान 10 वर्षे पूर्ण झालेली असावी. किमान 25 सहकारी बँका संस्थेच्या सभासद असाव्यात. संस्थेचा डिट वर्ग मागील सलग 3 वर्षे  असावा व संस्था मागील 3 वर्षात नफ्यात असावी. नामतालिकेवर समाविष्ट होणाऱ्या एजन्सीसाठी अधिकची पात्रता व लागू अटी  शर्तीसाठी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

           संबंधित संस्थांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे नविन मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, पुणे, 411001 यांच्या नावे करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 25 एप्रिल 2022 पर्यंत आहे. प्राप्त अर्जांची छाननी दि. 5 मे 2022 रोजी पूर्ण करून अंतिम नामिका दि. 11 मे 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...