Wednesday, April 6, 2022

मद्यविक्री बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी

 


जिल्ह्यात 14 एप्रिलला 'कोरडा दिवस'

मद्यविक्री बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी

 

अमरावती, दि. 6 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी दि. 14 एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्यातील सर्व देशी व विदेशी किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या संपूर्ण बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी निर्गमित केले आहेत. 

जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मुंबई दारूबंदी कायद्यामधील कलम 142 (1) अन्वये अधिकाराचा वापर करून अमरावती जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या सीएल-3, एफएल-2, सीएलटीओडी-3, एफएलबीआर-2, एफएल-3 आदी सर्व दि. १४ एप्रिल रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी निर्गमित केले आहेत.

अनुज्ञप्तीधारकांनी व संबंधितांनी या आदेशांचे पालन न केल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदेशाद्वारे देण्यात आला आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...