जलसंपदा राजमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून कर्जमाफी योजनेचा आढावा विविध विभागाच्या आढावा बैठकीत दिले निर्देश

 










जलसंपदा राजमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून कर्जमाफी योजनेचा आढावा

विविध विभागाच्या आढावा बैठकीत दिले निर्देश

 

     अमरावती दि 21: विभागातील जिल्हा मध्यवर्ती बँकांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पोर्टलवर माहिती सादर केली होती त्या खात्यांपैकी पूर्ण कर्ज माफीची खाती, एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत येणारी खाती व नियमित कर्जदारांची खाती असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांनी सहायक निबंधक कार्यालयात अर्ज सादर करावा. याबाबत बँकेने अर्जदारांशी संपर्क साधून परत अर्ज करण्याबाबत सूचना कराव्या.असे निर्देश जलसंपदा व  लाभक्षेत्र मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना व कर्ज पुनर्गठन योजनेबाबत आढावा राज्यमंत्र्यांकडून घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

     सहकारी संस्थेचे  विभागीय सहनिबंधक राजेश लव्हेकर, अकोला येथील सहकारी संस्थेचे उपनिबंधक विनायक काहळेकर, सहायक निबंधक (प्रशासन) मधुसूदन लाठी, यवतमाळ व वाशीम जिल्हयाचे उपनिबंधक रमेश कटके, बुलडाणाचे जिल्हा उपनिबंधक घोंगे, बुलडाणा सहकारी बँकेचे अरुण चव्हाण, अकोला मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुधाकर झळके, अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल आदी उपस्थित होते.

महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेचा आढावा

     या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या संबंधित 13 हजार खात्यांची कर्जमाफीची रकम शासनाकडून अद्याप प्राप्त झाली नाही ती प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश श्री कडू यांनी संबंधितांना दिले.

अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव स्वीकारावे

      चांदुर बाजार व अचलपूर येथील अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी ऑनलाइन पध्दती सोबतच ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव स्वीकारावे. तसेच ऑनलाइन पध्दतीने प्रस्ताव सादर करताना येणाऱ्या तांत्रिक बाबींची समस्या तात्काळ सोडविण्यात यावी असे निर्देश श्री कडू यांनी आढावा बैठकीत दिले.

 

 

      अचलपूर, चांदुर बाजार तालुक्यात ग्रामीण भागात  घरकुलांच्या निर्मितीसाठी शासकीय जमिनीवरील करण्यात आलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.चांदुर बाजार येथे 402 व अचलपूर येथे 82 प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती संबंधितांनी यावेळी दिली.

 

     जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे, अचलपूरचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण सावळे, चांदुर बाजारचे संजय काळे, तसेच तांत्रिक बाबींची समस्या सोडवण्यासाठी दुरदृश्य प्रणालीद्वारे राज्य व्यवस्थापन कक्षाचे उपसंचालक मधुकर वाघ, सुरज पाटील, मंदार राणे आदी उपस्थित होते.

 

धरणातून गाळ काढून पाणी संचय क्षमता वाढविण्याच्या उपक्रमात युवकांचा सहभाग

 

     धरणातील गाळ काढून धरणाची पाणी संचय क्षमता वाढविणे ही काळाची गरज आहे यासाठी युवकांना या कार्यात सहभागी करून घेता येईल अशा सूचना श्री कडू यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत दिल्या.प्रत्येक तालुक्यातील एका धरणाची निवड करून येणारा संपूर्ण महिना हा उपक्रम राबविण्यात यावा. यासाठी आवश्यक तो निधी प्राप्त करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती व ग्रामपंचायत स्तरावर तात्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले.

      यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपायुक्त (पुनर्वसन)गजेंद्र बावणे, वाशीमचे उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण, यवतमाळ उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, बुलडाणा उपजिल्हाधिकारी अनिल माचेवड, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अभय पाठक, पाटबंधारे विभागाचे संबंधित व माजी सैनिक उपस्थित होते.

 

               0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती