Friday, April 1, 2022

जिल्ह्यात अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रासाठी साडेचार कोटी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 



जिल्ह्यात अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रासाठी साडेचार कोटी

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 31 : जिल्ह्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 4 कोटी 55 लाख रूपये निधी अल्पसंख्याक विकास विभागाकडून जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात आला आहे. अल्पसंख्याक लोकसमूहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक मूलभूत व पायाभूत सुविधा उभारण्यात येत असून, या निधीमुळे विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला.

जिल्ह्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी विविध कामांचे नियोजन करण्यात आले असून, अनेक कामांना चालनाही देण्यात आली आहे. त्यासाठीचा निधी तत्काळ मिळून कामे पूर्णत्वास जाण्यासाठी पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्याकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. पालकमंत्र्यांनी स्वत: या क्षेत्राचा दौरा करून तेथील नागरिकांच्या मागण्या जाणून घेतल्या व त्यानुसार कामे राबविण्यात येत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याने शासनाकडून साडेचार कोटी निधी जिल्ह्याला वितरित करण्यात आला आहे.

            अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रातील कामांमध्ये शिराळा येथील दर्ग्याजवळ सभामंडपाची संरक्षणभिंत, कु-हा येथील अकबरअली ते जामा मशिदीपर्यंत काँक्रिट रस्ता,  उदापूर येथे अखिलभाई चाऊस यांचे घर ते मशिदीपर्यंत काँक्रिट रस्ता, पूर्णानगरच्या येलमी रस्ता मुस्लिम कब्रस्तान येथे ओटा, नांदगावपेठेत शादीखाना येथे संरक्षण भिंत, टाकरखेडा शंभू येथे आष्टी मुख्य रस्ता ते शाहदत खान यांच्या घरापर्यंत काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम, तळेगाव ठाकूर येथे मुस्लिम कब्रस्तानाला संरक्षण भिंत याबरोबरच तिवसा तालुक्यात अल्पसंख्याक वस्त्यांत विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत.

नारायणपूर (कापूसतळणी) येथील कब्रस्तानाकडे जाणा-या रस्त्याचे बांधकाम, उपराई येथील कब्रस्तानाकडे जाणारा रस्ता, काळगव्हाण येथे शादीखाना बांधकाम, पनोरा येथे कब्रस्तानाकडे जाणारा रस्ता, खिरगव्हाण समशेरपूर येथे रस्ता, टाकरखेडा येथे कब्रस्तानकडे जाणारा रस्ता व कुंपण भिंत, खल्लार येथे शादीखाना बांधकाम, शिरजगाव कसबा, तळेगाव मोहना, करजगाव गोविंदपूर, ब्राम्हणवाडा थडी, कु-हा व शिरजगाव बंड येथे शादीखाना आदी कामे होणार आहेत.

डाबका, हरिसाल, कळमखार, पथ्रोट, कांडली, आमनेर, वघाळ, गव्हाणकुंड, बेनोडा, सावंगा, लोणी पुसला आदी गावांमध्ये कब्रस्तान संरक्षण भिंत किंवा कब्रस्तान संरक्षण कुंपण आदी कामे, तसेच कुसुमकोट बु., पळसकुंडी, पथ्रोट येथे समाजभवन उभारण्याचे नियोजन आहे.

0000

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...