जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गुुरुवारी आरोग्य मेळावा

 जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गुुरुवारी आरोग्य मेळावा

 

अमरावती दि. 20 : केंद्रिय स्वास्थ व कुटुंब कल्याण, मंत्रालय, भारत सरकार, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य विद्यमाने, आजादी का अमृत महोत्सव व आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र यांचा 4 था वर्धापन दिनानिमित्त आणि आयुष्यमान भारत डिजीटल मिशन अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे गुरुवार, दिनांक 21 एप्रिलला आरोग्य मेळावा आयोजित करण्यात येत आहे.

नियोजनानुसार सदर शिबिरामध्ये डिजीटल हेल्थ आयडी काढणे, आयुष्यमान कार्ड वाटप, तपासणी, उपचार, टेलीकम्युनिकेशन, स्त्रीरोग, प्रसुती, स्तनपान, लसिकरण, बालरोग, कुटुंब कल्याण कार्यक्रम समुपदेशन, गर्भनिरोधक साधनांचा वापर बाबत समुपदेशन, मलेरिया, क्षयरोग, कुष्ठरोग, मोतीबिंदू, संसर्गजन्य आजार, असंसर्गजन्य आजार जसे उच्च रक्तदाब, मधुमेहाचे लवकर निदान, एच.आय.व्ही समुपदेशन, कॅन्सर, हृदयरोग, अस्थमा, दंत, कान, नाक, घसा, प्लास्टीक सर्जरी, त्वचा व त्वचाविज्ञान, आवश्यक रक्त चाचण्या, ई.सी.जी., एक्स-रे, आयुर्वेदिक, युनानी, सिदध, होमेओपॅथी, इतर तपासण्या व औषधांसह मूलभूत आरोग्य सेवा आणि संबंधित आरोग्य तज्ञांशी दूरसंचारव्दारे तपासणी (स्क्रिनिंग) प्रदान करण्यात येईल.

एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी- पिवळे, केसरी अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका धारक कुटुंबे, शासकीय अनाथाश्रमातील मुले, शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरीक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत जिवित बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंब संबंधित संस्था/प्राधिकरण यांचे कडील ओळखपत्रानुसार पात्र.

तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी सामाजिक व आर्थिक व जातनिहाय जनगणनेत नोंदीत ग्रामिण व शहरी भागातील कुटुंबे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड (पात्र लाभार्थ्यांना) काढून देण्यात येणार व सर्व नागरिकांचे आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड काढून देण्यात येणार आहे. आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांकासह मोबाईल सोबत आणावा.

लाभ घेण्यासाठी वैध शिधापत्रिका व फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड व शासनमान्य फोटो- ओळखपत्र इत्यादी सोबत आणावे.)

  आरोग्य मेळाव्याचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती