जागतिक आरोग्य दिन निमित्त सायक्लोथॉन रॅली आयोजन

 जागतिक आरोग्य दिन निमित्त सायक्लोथॉन रॅली आयोजन

            अमरावती, दि.4: दरवर्षी 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी अव्हर प्लॅनेट अव्हर हेल्थ या घोषवाक्यासह कोविड लसीकरण बाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधुन आरोग्याबाबत तसेच कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करीता आरोग्य विभाग जिल्हा सामान्य रूग्णालय अमरावती, इंडियन मेडीकल असोशिएशन आय.एम.ए अमरावती, वुमन डॉक्टर्स विंग, अमरावती इ.एन.टी असोशिऐशन, अमरावती ओ.बी.जी.वाय सोसायटी,विदर्भ ऑफथॅलमिक सोसायटी, अमरावती डेन्टल असोशिऐशन, असोशिऐशन ऑफ सर्जन ऑफ अमरावती, विदर्भ इ.एन.टी असोशिऐशन, अमरावती जिल्हा ऑफथॅलमिक सोसायटी, दिव्य योग साधना ट्रस्ट, अमरावती ऑटोमोबाइल असोशिऐशन, रोटरी क्लब ऑफ अमरावती, जे.सी.आय. अमरावती, गोल्डन समर्पण हनुमान चालीसा परिवार, जे.सी.आय. अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक आरोग्य दिन निमित्त सायक्लोथॉन रॅली चे आयोजन दि.7 एप्रिल 2022 रोजी सकाळी 6.30 वाजता आय.एम.ए हॉल येथुन करण्यात आलेले आहे. सदर रॅलीला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून सुरवात करतील. ही रॅली दहा किलोमिटर असुन अंदाजे एक तास या रॅलीला वेळ लागू शकते. तरी सायक्लोथॉन आरोग्य जनजागृती रॅलीमध्ये आपल्या सायकलसह सर्व जनमानसांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व इंडियन मेडीकल असोशिऐशन अमरावती यांच्या व्दारे करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती