भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम
तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र वाटप
अमरावती, दि. 13 :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
समता कार्यक्रमात सामाजिक न्याय भवन सभागृहात तृतीयपंथी व्यक्तींमध्ये जनजागृती व ओळखपत्र वाटप आणि उद्योग क्षेत्रात येण्यास इच्छुक युवक युवतींना प्रशिक्षण कार्यशाळा झाली.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे
अध्यक्ष समीर कुर्तकोटी अध्यक्ष,विभागीय
अधिकारी प्रदिप इंगळे, प्रादेशिकउपायुक्त सुनिल वारे,सहायकआयुक्त माया केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारीराजेंद्र जाधवर,संशोधनअधिकारी दिपा हेरोळे आदी उपस्थित होते.
सामाजिक न्याय हा आर्थिक प्रगतीशिवाय शक्य नाही. त्यामुळे विकासाच्या मुख्य प्रवाहात विविध घटकांना सामावून घेण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात, असे श्री. कुर्तकोटी यांनी
सांगितले.
प्रातिनिधीक स्वरुपात तृतीयपंथी
व्यक्तींना ओळखपत्र देण्यात आले. त्याबाबत बोलताना जगजितसिंग चव्हाण म्हणालेकी, आमच्याकडे समाज उपेक्षेने पाहत होता.मात्र,
सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेऊन राज्यातील तृतीयपंथीयांसाठी आमच्या संरक्षणाच्या दृष्टीने कल्याण मंडळाची स्थापना केलीव आम्हाला ओळख निर्माण करून समाजातील एक घटक म्हणून मान्यता दिली.
आम्हाला रितसर ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळाले. हे समाधानकारक असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. यानंतर
उद्योग क्षेत्रात येऊ इच्छिणा-या युवक-युवतींसाठी कार्यशाळा झाली. विभागीय अधिकारी
प्रदीप इंगळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
00000
No comments:
Post a Comment