वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी जिल्ह्याला 4 कोटी 30 लक्ष प्राप्त पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याने तत्काळ निधी मिळाला

 


वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी जिल्ह्याला 4 कोटी 30 लक्ष प्राप्त

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याने तत्काळ निधी मिळाला

    अमरावती दि 11 : जिल्ह्यात नियमित आरोग्य सेवा देणा-या वैद्यकीय अधिका-यांचे वेतन पाच महिन्यांपासून प्रलंबित असल्यामुळे वैद्यकीय अधिका-यांतर्फे आरोग्य विभागाला निवेदन देऊन संप आंदोलनाचा इशारा दिला. या बाबीची तत्काळ दखल घेऊन जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती ॲड. यशोमती ठाकूर यांनी घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्ह्याला 4 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, लवकरच हे वेतन अदा करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी आज सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथील स्थायी व अस्थायी नवनियुक्त वैद्यकीय अधिका-यांचे वेतन काही महिन्यांपासून प्रलंबित होते. त्यामुळे या अधिका-यांनी आरोग्य विभागाला निवेदनाद्वारे संप आंदोलनाचा इशारा दिला. या बाबीची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी चर्चा केली व वैद्यकीय अधिका-यांचे वेतन तत्काळ अदा करण्याचे निर्देश दिले.

त्यामुळे आरोग्य विभागाकडून सर्व नवनियुक्त वैद्यकिय अधिकाऱ्यांचे नोव्हेंबर ते मार्च अशा पाच महिन्यांच्या वेतनाचे अदा करण्यासाठी 4 कोटी 30 लक्ष रुपये तात्काळ मंजूर करण्यात आला. हा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिका-यांनी दिली.

 या निधीद्वारे संबंधित वैद्यकीय अधिका-यांचे वेतन तत्काळ अदा करण्यात यावे. यापुढे कधीही वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांचे वेतन प्रलंबित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती