कृषी निविष्ठांबाबत तक्रारींवरील कारवाईसाठी भरारी पथके

कृषी निविष्ठांबाबत तक्रारींवरील कारवाईसाठी 

भरारी पथके

 

अमरावती, दि. 12 : आगामी खरीप हंगाम लक्षात घेता बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांबाबत प्राप्त तक्रारींचा पडताळा व कारवाईसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, उपविभागीय स्तरावर तक्रार निवारण समित्याही गठित करण्यात आल्या आहेत.

 

या पथकांनी कृषी निविष्ठांची गुणवत्ता आदींबाबत दक्ष राहून जिल्हाभर धडक मोहिम राबबावी व आवश्यक ती कारवाई करावी, असे निर्देश पथकांना देण्यात आले आहेत.

 

जिल्हास्तरीय पथकाचे प्रमुख कृषी विकास अधिकारी गोपाळराव देशमुख हे असून, त्यांचा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक (0721-2662878), तर भ्रमणध्वनी क्रमांक 9422855587 आहे. जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक दादासाहेब पवार हे सदस्य सचिव असून, त्यांचा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक (0721-2662943), तर भ्रमणध्वनी क्रमांक 8975815204 असा आहे.

त्याचप्रमाणे, संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी सदस्य असून, त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक 7588084749, तसेच 8329511202 आणि 9604741733 असे आहेत.

मोहिम अधिकारी ल. ग. आडे हे सदस्य असून, त्यांचा कार्यालयीन दूरध्वनी 0721-2662878 व भ्रमणध्वनी 9421572331 आहे. वजनमापे निरीक्षक ए. डी. तोटे हे सदस्य असून, त्यांचा कार्यालयीन दूरध्वनी (0721-2663089) आणि भ्रमणध्वनी क्रमांक 9423425115 असा आहे.

तालुकास्तरीय पथकांमध्ये तालुका कृषी अधिकारी पथकप्रमुख असतील. तसेच, कृषी अधिकारी, वजन मापे शास्त्र निरीक्षक, मंडळ कृषी अधिकारी, पं. स. कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक) आदी सदस्य आहेत.


तक्रार निवारण समित्या गठित

 

प्राप्त तक्रारींच्या निवारणासाठी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर अमरावती, मोर्शी व अचलपूर येथे तक्रार निवारण समित्या गठित करण्यात आल्या आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी अध्यक्ष असतील व तालुका कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठ, संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र यांचे प्रतिनिधी, महाबीज प्रतिनिधी हे सदस्य आहेत. पंचायत समितीचे कृषी अधिकारी सदस्य सचिव आहेत.

00000

 

  

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती