‘आयुष्मान भारत’ योजनेत प्रत्येक तालुक्यात आरोग्य मेळावा

 

आयुष्मान भारतयोजनेत प्रत्येक तालुक्यात  आरोग्य मेळावा

 

अमरावती, दि. १५ : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयुष्मान भारत मिशनअंतर्गत दि. १८ ते २२ एप्रिलदरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

अशा आहेत तालुकानिहाय तारखा

त्यानुसार दि. १८ एप्रिलला ग्रामीण रूग्णालय, चुरणी व दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात, दि. १९ एप्रिलला वरूड, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, नांदगाव खंडेश्वर येथील  ग्रामीण रुग्णालयात, तर दि. २० एप्रिलला अमरावतीत सामान्य रुग्णालय, मोर्शी येथे उपजिल्हा रुग्णालय, भातकुली ग्रामीण रुग्णालयात मेळावा होईल. त्याचप्रमाणे, तिवसा उपजिल्हा रुग्णालय, अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय येथे २१ एप्रिल रोजी मेळावा होईल. अचलपूर व धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणि धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दि. २२ एप्रिल रोजी मेळावा होईल.  

तपासणी  व उपचारांबरोबरच इतर सुविधा

          या शिबिरांमध्ये डिजिटल हेल्थ आयडी काढणे, आयुष्यमान कार्ड वाटप, तपासणी, उपचार, टेलिकम्युनिकेशन, स्त्रीरोग, प्रसुती, स्तनपान, लसिकरण, बालरोग, कुटूंब कल्याण कार्यक्रम समुपदेशन, गर्भनिरोधक साधनांचा वापर बाबत समुपदेशन, मलेरिया, क्षयरोग, कृष्ठरोग, मोतिबिंदू, संसर्गजन्य आजार आदींबाबत तपासणी व उपचार उपलब्ध असतील.

 त्याचप्रमाणे, असंसर्गजन्य आजार जसे  उच्चरक्तदाब, मधुमेहाचे लवकर निदान, एच.आय.व्ही. समुपदेशन, कॅन्सर, ह्दयरोग, अस्थमा, दंत, कान. नाक.घसा., प्लास्टीक सर्जरी, त्वचा व त्वचाविज्ञान, आवश्यक रक्तचाचण्या, ई.सी.जी., एक्स-रे, आयुर्वेर्दीक, युनानी, सिदध, होमेओपॅथी, इतर तपासण्या व औषधांसह मूलभूत आरोग्य सेवा आणि संबंधित आरोग्य तज्ज्ञांशी दूरसंचाराव्दारे तपासणी (स्क्रीनिंग) प्रदान करण्यात येईल.

जनआरोग्य योजनेचे निकष

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी निकष पुढीलप्रमाणे आहेत: पिवळे, केसरी अंत्योदय अन्न्‍ योजना, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका धारक कुटूंबे, शासकिय अनाथाश्रमातील मुले, शासकिय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकिय महिला आश्रमातील महिला, शासकिय वृदधाश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत जिवित बांधकाम कामगार व त्यांचे कुटूंब- संबंधीत संस्था / प्राधिकरण यांचे कडील ओळखपत्रानुसार पात्र.

तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा घेण्यासाठी लाभार्थी सामाजिक व आर्थिक व जातनिहाय (SECC) जनगणनेत नोंदीत ग्रामिण व शहरी भागातील कुटूंबे.

          प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड (पात्र लाभार्थ्यांना) काढून देण्यात येणार आहे.

आरोग्य कार्ड मिळेल

सर्व नागरिकांचे आयुष्मान भारत आरोग्य कार्ड (ABHA Card) काढून देण्यात येणार आहे. आधार लिंक असलेला मोबईल क्रमांकासह मोबाईल सोबत आणावा. लाभ घेण्यासाठी - वैध शिधापत्रिका व फोटो ओळखपत्र सोबत आणावे. (आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड व शासनमान्य फोटो ओळखपत्र आदी.)

या आरोग्य मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविण्याबाबतचे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

०००

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती