Wednesday, April 13, 2022

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि.13 : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कारासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून दि. 20 एप्रिलपूर्वी अर्ज मागविण्यात आले आहेत.

वीरशैव लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करित असलेल्या व्यक्तीच्या व संस्थेच्या कामाची दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी, या हेतूने व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थेसाठी एक असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहे.

          सदरहू पुरस्कार सन 2018-19,2019-20,2020-21,2021-22 या चार वर्षांसाठी देण्यात असल्याने त्या त्या वर्षांसाठी चार वेगवेगळे रितसर अर्ज करण्यात यावेत, असे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

पुरस्काराचे निकष

पुरूषाचे वय 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे. स्त्रियांचे वय 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे. वरील क्षेत्रात कमीत कमी 10 वर्षे वैयक्तिक किंवा संघटनात्मक अभिजात कार्य करणाऱ्या व्यक्ती या पुरस्कारास पात्र असतील.

सामाजिक संस्थासाठी पात्रता

संस्था पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1960खाली नोंदणीकृत असावी. स्वयंसेवी संस्थेचे समाजकल्याण क्षेत्रातील सेवा कार्य 10 वर्षापासून अधिक असावे. स्वयंसेवी संस्था राजकारणापासून अलिप्त असावी.

अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अमरावती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन पोलीस आयुक्तालयामागे, चांदुर रेल्वे रोड, अमरावती येथे विनामुल्य उपलब्ध आहे. अर्जासह नुकतेच काढलेले पासपोर्ट साईज फोटो तीन प्रती, वयाचा दाखला, शैक्षणिक पुरावा, सामाजिक कार्याची माहिती व त्यासंबंधित पुरावे, पोलीस विभागाचा चारित्र्य पडताळणी दाखला आदी सर्व तीन प्रतीत जोडणे आवश्यक आहे.  

00000

 

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...