Friday, April 8, 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे विभागीय स्तरावर टेक्निकल प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन



 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत शासकीय तंत्रनिकेतन अमरावती

येथे विभागीय स्तरावर टेक्निकल प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन.

अमरावती, दि.8: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या शासनाच्या उपक्रमाअंतर्गत शैक्षणीक संस्थामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले आहे. या अनुषंगाने तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालक कार्यालय व शासकीय तंत्रनिकेतन यांचे संयुक्त विद्यमाने अमरावती विभागीय स्तरावर संस्थेच्या परिसरात पदविका अभ्यासक्रम निगडित तांत्रिक प्रोजेक्ट स्पर्धा, दि. 13 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. तसेच स्पर्धेमध्ये विभागातील सर्व जिल्ह्यातील तंत्रिनिकेतनामधील सर्व शाखेचे विद्यार्थी सहभागी होणार असून ते त्यांचे नवीन तंत्रज्ञानावर आधारीत प्रोजेक्टचे सादरीकरण करणार आहेत. तसेच नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये 300 च्या वर विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. तरी विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेच्या सादरीकरणाला भेट देऊन नवीन तंत्रज्ञानाबद्दलचे ज्ञान वृद्धिगत करण्याचे आवाहन सहसंचालक, अमरावती विभाग, तथा प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती डॉ. व्ही. आर. मानकर, यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...