संविधानपठणाचे उपक्रम हाती घ्यावेत
- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. 14 : संविधानाने या देशातील नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आदी हक्क मिळवून दिले आहेत. संविधानाबाबत जागृतीसाठी संविधानपठणाचा कार्यक्रम सर्वदूर आयोजित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
येथील अर्जुननगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन मंच व सावित्रीबाई फुले महिला मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मंच व मंडळाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, संविधानाने सर्वांना समता, न्याय, स्वातंत्र्य आदी अधिकार मिळवून दिले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आदर्श राज्यघटना देशाला दिली. संविधानाबाबत सर्वदूर जागृती होण्यासाठी ठिकठिकाणी संविधानपठणासारखे राबवले पाहिजेत.
प्रारंभी पालकमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी श्री. म्हात्रे, श्री. तायडे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment