जिल्हाधिकाऱ्यांनी केली तपोवनची पाहणी

 






जिल्हाधिकाऱ्यांनी केली तपोवनची पाहणी

 

अमरावती, दि.3 :  कुष्ठरोग्यांसाठी दीर्घकाळापासून अविरत कार्यरत असलेल्या तपोवन या सामाजिक संस्थेला आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे सांगितले.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी तपोवन या संस्थेला यांनी आज भेट देऊन पाहणी केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी, सदस्य विवेक मराठे, प्रभारी सचिव सहदेव गोळे यासह कुष्ठरोग आरोग्य सेवा सहायक संचालक डॉ. अजय डवले, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाठ, वैद्यकीय परिवेक्षक दीपक गडलिंग आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्रीमती कौर यांनी तपोवन येथे कुष्ठरोग्यांमार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. तसेच तपोवनातील आश्रित उद्योगधंद्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. येथील मुद्रणालयाला त्यांनी भेट देऊन कामकाजाचे स्वरुप जाणून घेतले. येथील पेपर कटींग, बाईंडिंग आदी काम करणाऱ्या कुष्ठरोग्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या कामाचे स्वरुप जाणून त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आश्वासन दिले.

येथे सुतार काम उद्योगामध्ये लाकडाचे फर्निचर मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येते. तसेच शिवणकला उद्योगामध्ये शाळेचे गणवेश शिवणे, ऑपरेशन थिएटरमध्ये लागणारे ॲप्रॉन शिवणे तसेच आवश्यकतेनुसार शिवण काम करण्यात येते. याचीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. तपोवनमध्येच लोखंडी कपाटे, रॅक्स तयार करण्यात येतात. याला बाहेर मोठी मागणी असते. याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली. कुष्ठरुग्णांसाठी असलेली निवास तसेच भोजनगृहाची पाहणी केली. येथील रुग्णांनी फुलविलेल्या शिव उद्यानाचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर तपोवन परिसरात श्रीमती कौर यांच्या हस्ते सुपारीचे झाड लावून वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. तपोवनमार्फत चालविण्यात येत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना श्रीमती कौर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती