Saturday, August 6, 2022

अचलपूर तालुक्यातील माजी सैनिक, विधवा यांचा 10 ऑगस्टला सैनिक मेळावा

 अचलपूर तालुक्यातील माजी सैनिक, विधवा

यांचा 10 ऑगस्टला सैनिक मेळावा

        अमरावती, दि. 5: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत अचलपूर तालुक्यातील माजी सैनिक, विधवा, अवलंबित व्यक्ती यांचा बुधवार, दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी अचलपूर तहसिल कार्यालय, नवीन सभागृहात  सकाळी 11 वाजता सैनिक मेळावा आयोजित केला आहे. अचलपूर तालुक्यातील सर्व माजी सैनिक, विधवा, अवलंबित व्यक्ती यांनी या मेळाव्याला हजर राहण्याचे आवाहन अचलपूर तहसिलदार व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी केले आहे.

माजी सैनिक, विधवा तसेच अवलंबितांना दैनंदिन जीवनात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच सेवारत सैनिक यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

             

00000

--

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...