Thursday, August 18, 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध कार्यक्रम

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध कार्यक्रम

 

अमरावती दि.18 (विमाका) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवतंर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम विभाग प्रमुख, अधिष्ठाता, अध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रा. डॉ. ए. एम. महल्ले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांतर्गत सहायक प्राध्यापक, कॅप्टन डॉ. सुनील इंगळे यांचे राष्ट्रध्वजाचा इतिहास व महत्व या विषयावर व्याख्यान, पालक शिक्षक सभा, देशभक्तीपर समुहगान स्पर्धा, घरी व कार्यालयात केलेल्या ध्वजारोहणाच्या सेल्फींचे संकलन, प्रभात फेरी, चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विविध कार्यक्रमांना प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. 

 

                                                         00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...