Saturday, August 6, 2022

पुणे महानगरपालिका आस्थापनेत सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबत माजी सैनिकांना सूचना

 पुणे महानगरपालिका आस्थापनेत सरळसेवेने

रिक्त पदे भरण्याबाबत माजी सैनिकांना सूचना

अमरावती, दि.5: अमरावती जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना कळविण्यात येते की, पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील श्रेणी-2 व श्रेणी-3 या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी वर्ग 2 मधील 4 पदे व वर्ग 3 मधील 444 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची  अंतिम मुदत 10 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे.

            इच्छुक उमेदवारांनी https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. तरी इच्छुक माजी सैनिकांनी  या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...