Wednesday, August 10, 2022

कृषी प्रक्रिया व्याज सवलत योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ द्यावा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 


कृषी प्रक्रिया व्याज सवलत योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ द्यावा

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 10 : ॲग्री इन्फ्रास्टक्चर फंड अंतर्गत कृषी प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज प्रक्रियेत शेतकरी बांधवांना व्याज सवलत देण्यात येते. त्याचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांना लाभ करुन द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागातर्फे आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, कृषी विभागाचे विविध अधिकारी त्याचप्रमाणे शेतकरी गट, महिला गट आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शेतमालावर प्रक्रिया करुन त्याची विक्री व विपणन केल्यास मुल्यवर्धन होऊन शेतकरी बांधवांना लाभ होतो. त्यामुळे फंडांतर्गत 3 टक्के व्याज सवलत देण्यात येत आहे. त्याचा अधिकाधिक शेतकरी बांधवांना लाभ मिळावा यासाठी प्रचार, प्रसिध्दी सर्वदूर करावे. सर्वांनी समन्वयाने ही योजना व्यापक स्वरुपात राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...