Saturday, August 6, 2022

अमरावती तालुक्यातील माजी सैनिक, विधवा यांचा 9 ऑगस्टला सैनिक मेळावा


अमरावती तालुक्यातील माजी सैनिक, विधवा

यांचा 9 ऑगस्टला सैनिक मेळावा

अमरावती, दि. 5: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत अमरावती तालुक्यातील माजी सैनिक, विधवा, अवलंबित व्यक्ती यांचा मंगळवार, दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता सैनिक मेळावा आयोजित केला आहे. अमरावती तालुक्यातील सर्व माजी सैनिक, विधवा, अवलंबित व्यक्ती यांनी या मेळाव्याला हजर राहण्याचे आवाहन अमरावती तहसिलदार व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी केले आहे.

माजी सैनिक, विधवा तसेच अवलंबितांना दैनंदिन जीवनात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच सेवारत सैनिक यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...