Wednesday, August 10, 2022

नेहरू युवा केंद्र अमरावती व्दारा स्वच्छता पंधरवाडयाचे आयोजन

 नेहरू युवा केंद्र अमरावती व्दारा स्वच्छता पंधरवाडयाचे आयोजन

            अमरावती, दि.10: आपले देश हा वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणुन साजरे करीत आहे. नेहरू युवा केंद्र युवा, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार व्दारा 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट केंद्र शासनाच्या आदेशानुसार स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात आहे. या पंधरवाडया दरम्यान नेहरू युवा केंद्राशी संलग्रीत तसेच इतर क्रीडा मंडळ, युवक मंडळ यांच्या माध्यमातुन गावागावात स्वच्छता अभियान राबविण्यात आहे.

            नेहरू युवा केंद्राचे स्वयंसवेक गावकऱ्यांना स्वच्छते विषयी मार्गदर्शन व कार्यक्रम आयोजित करणार आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळया गावात स्वच्छते संबंधित निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करणार आहे. स्वच्छता अभियान राबवितांना गाव स्वच्छता, गावातील पुतळयाची स्वच्छता, तसेच विहिरी जवळील स्वच्छता व संपूर्ण गाव स्वच्छता कसे राहिल या विषयी या पंधरवाडयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...