Thursday, August 18, 2022

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी यांनी दिली सद्‌भावना दिवस प्रतिज्ञा

 



राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त

जिल्हाधिकारी यांनी दिली सद्‌भावना दिवस प्रतिज्ञा

 

अमरावती, दि. 18:  माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्‌भावना दिवस प्रतिज्ञा दिली.

जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची  तसेच सर्व प्रकारचे मतभेद हे हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची प्रतिज्ञा जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना दिली.

निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल,  उपजिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मनिष गायकवाड, उपजिल्हाधिकारी राम लंके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, नाझर किशोर चेडे, अमोल दांडगे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. 

000000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...