विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची वरुडला भेट अतिवृष्टीग्रस्त परिसराची पाहणी

 







विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची वरुडला भेट

अतिवृष्टीग्रस्त परिसराची पाहणी

 

अमरावती, दि. 10 : विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी वरुड येथे मंगळवारी भेट देऊन अतिवृष्टीबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला. व अतिवृष्टीग्रस्त परिसराची पाहणी केली.

 वरुड तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व यंत्रणांनी सजग राहून कामे करावीत. पंचनाम्याची प्रक्रिया सविस्तर व तपशीलवार करावी. शेतकरी बांधव व अतिवृष्टी बाधितांशी संवाद साधून पंचनाम्याची प्रक्रिया परिपूर्ण करावी. त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी दिले.

 यावेळी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी निवारा केंद्राची पाहणी केली. त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी वरुड येथील अतिवृष्टीग्रस्त परिसरात पाहणी करुन नागरीकांशी संवाद साधला. व नुकसानीची माहिती घेतली. उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार गजेंद्र मालठाणे आदी उपस्थित होते.

 

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती