डॉ.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 121 जयंती मोठ्या उत्साहात साजरी
अमरावती, दि.4: नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत
सरकार अंतर्गत डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 121 जयंती, दिनांक 6 जुलै 2022 ला मोठ्या
उत्साहात मा गायत्री बहुउद्देशिय शिक्षण संस्था नवसारी येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे
अध्यक्ष कृष्णकुमार अग्रहवाल तसेच प्रमुख वक्ते म्हणून तुषार भडंग यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे
मार्गदर्शन केले.मार्गदर्शनात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी कोण होते तसेच त्यांचा जीवनकाळ
या सोबतच भारतात अनेक महापुरुष होऊन गेलेत त्या सर्वांनमध्ये एक सामान्य बाब आहे ती
म्हणजे गरिबांसाठी जनसामान्यांसाठी झटण्याची तळमळ याबद्दल सांगण्यात आले. आपण त्यांच्या
पासून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनामध्ये महापुरुषांच्या आयुष्यातून धडे घेण्याचे आवाहन
प्रमुख अतिथी तुषार भडंग यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता साक्षी कैलास केवटी
(तालुका स्वयंमसेवक ने.यु.के.)हिने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार मा गायत्री बहुद्देशीय
शिक्षण संस्था येथिल सहशिक्षिका कु.स्नेहल इंगोले यांनी मानले.
0000
No comments:
Post a Comment