Tuesday, August 9, 2022

बेंबळा दुर्घटनेप्रकरणी मदतकार्य सुरू

 





बेंबळा दुर्घटनेप्रकरणी मदतकार्य सुरू

अमरावती दि.9 : बेंबळा दुर्घटनेप्रकरणी मदतकार्य व शोध मोहिम सुरू असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, नांदगाव खडेश्वर तालुक्यातील नांदगाव ते जावरा या मार्गावरील बेंबळा नदीला आलेल्या पुरात काल सायंकाळी ट्रॅक्टर व  पाच व्यक्ति वाहुन गेल्या. पुरात वाहुन गेलेल्या पाचपैकी दोन व्यक्तिंनी तात्काळ पोहून किनारा गाठला, एका व्यक्तीने संपुर्ण रात्र झाडावर काढली व स्वत:चे प्राण वाचविले. उर्वरित दोन जणांचा शोध बचाव पथकाकडुन घेण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

          तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांच्या मार्गदर्शनात बचाव पथकातील सचिन धरमकर, दिपक पाल, विशाल निमकर, भुषण वैद्य, देवानंद भुजाडे, राजेंद्र शहाकार, दिपक चिल्लोरकर, गणेश जाधव व योगेश ठाकरे आदी पथक मोहिमेत कार्यरत आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...