तिवसा येथे वनउद्यानाच्या कामास सुरुवात आनंदवाडीत आदर्श वनोद्यानाची निर्मिती व्हावी - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 



तिवसा येथे वनउद्यानाच्या कामास सुरुवात

आनंदवाडीत आदर्श वनोद्यानाची निर्मिती व्हावी

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 1 : तिवसा येथील आनंदवाडीत वन उद्यानाच्या कामाला सुरुवात झाली असून येथे सुंदर व आदर्श वनोद्यान उभे राहावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथे दिले.

आनंदवाडी (तिवसा) येथील वनोद्यानाच्या कामाला पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या उपस्थितीत सुरुवात आज झाली.  तिवसा येथील नगराध्यक्ष वैभव वानखडे,जि प सभापती पूजा आमले, प स सभापती शिल्पा हांडे, उपसभापती शरद वानखडे,प.स सदस्य रोशनी पुनसे, निलेश खुळे,अब्दुल सत्तार,न प उपाध्यक्ष संध्या मुंदाणे, अतुल देशमुख,योगेश वानखडे, दिवाकर भुरभुरे,संध्या पखाले, मुकूंद देशमुख,दिलिप काळबांडे, संजय देशमुख, तहसीलदार वैभव फरतारे, मुख्याधीकारी पल्लवी सोटे, कार्यकारी अभियंता श्रीमती वैद्य , वनविभागाचे सूरकते व नागरिक यावेळी उपस्थित होते.

आनंदवाडी येथे वन विभागाची जागा असून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे १ हजार ६७० मीटरचे कुंपण उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. 

वनविभागाकडून येथे निसर्ग पर्यटन केंद्र उभारले जाणार आहे. येथे सुंदर व आदर्श वनोद्यान उभे राहण्यासाठी नियोजनपूर्वक कामे करावी. विविध प्रजातींची वृक्षसंपदा व विविध सुविधायुक्त असे एक आदर्श वनोद्यान तिवसानगरीत उभे राहावे, अशी अपेक्षा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

राज्य शासनाकडून  वृक्ष लागवड व पर्यावरण संरक्षणबाबत जागृती व्हावी म्हणून शाळा रोपवाटिका योजना राबविण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे, नगर वन उद्यान योजनेद्वारे शहरातील नागरिकांमध्ये वन व जंगलाबाबत जागृती निर्माण होण्यास मदत होणार आहे.

 

पालकमंत्री यांच्या पाठपुराव्याने तिवसा येथे विविध विकासकामे

 

तिवसा येथील विकासकामांबाबत स्वतंत्र बैठक मुंबईत वनमंत्री संजय राठोड यांच्या दालनात

झाली होती. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्यासह वनखात्याचे सचिव , मुख्य वनसंरक्षक, नगराध्यक्ष वैभव स वानखडे, न प मुख्याधिकारी आदी त्यावेळी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री यांच्या मागणीनुसार तिवसा न प क्षेत्रातील वनजमिनीवरील श्री ऋषि महाराज मंदिर टेकडी सभागृह , शेख फरीद बाबा टेकडी, परिसर विकास साठी निधी सहाय्य योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला.

याच धर्तीवर आनंदवाडी येथील जिल्हा नियोजन समिती मार्फत मंजूर डीपी व पोलचे काम सुद्धा पूर्ण झाले. तिवसा येथे वनउद्यान व संरक्षक भिंतीच्या कामाला  मंजुरी वन खात्याकडून देण्यात आली. त्यानुसार हे काम आज सुरू झाले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती