महिलांकरिता विशेष बससेवा उपलब्ध करावी ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 


महिलांकरिता विशेष बससेवा उपलब्ध करावी

ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

          मुंबईदि. 15: मुंबईमध्ये शासकीयनिमशासकीय आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे महिलांसाठी विशेष बससेवा तसेच शासकीयनिमशासकीयखाजगी आस्थापनेवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या प्रवासाकरिता अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून द्यावीअशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

            ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे यासंदर्भात मागणी केली आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे कीसंपूर्ण राज्यात सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सर्व अत्यावश्यक सेवेतील शासकीयखाजगी आस्थापनेवरील अधिकारी- कर्मचारी विशेषतः महिलांनाही कार्यालयात किंवा कर्तव्याच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने रेल्वेने प्रवास करण्यासाठी क्यू-आर कोडसहित पासेसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तथापिबहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्यू- आर कोड पासेस उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे पर्यायाने त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बसने प्रवास करावा लागत आहे.

            बसने प्रवास करण्याकरिता दररोज तास- दोन तास बसची प्रतीक्षा तसेच बस उपलब्ध झाल्यानंतरही त्यांना दोन-तीन तास प्रवास बसने करावा लागत आहे. विशेषतः महानगरमध्ये बसने येण्याजाण्यास खूप अडचणी येत आहे. तसेच बससेवेला होत असलेली गर्दी पाहता त्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे महिलांसाठी विशेष बससेवा तसेच शासकीय व खाजगी आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहेअसे ॲड. ठाकूर यांनी म्हटले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती