जेनरीकार्ट मेडिसीन मोबाईल ॲप्लीकेशनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जेनरीकार्ट मेडिसीन मोबाईल ॲप्लीकेशनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
गरजूंना घरपोच औषधे हा स्तुत्य उपक्रम
             - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

        कोरोना महामारीच्या संकटकाळात माणूसकीच्या दृष्टीकोनातून केलेली रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. जेनरीकार्ट मेडिसीन कंपनीव्दारे  गरजूंना घरपोच औषधे हा स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी काढले. या मोबाईल ॲप्लीकेशनचा जिल्ह्यातील गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवानही त्यांनी केले.

      १ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्याप्रसंगी जेनरीकार्ट मेडिसीनच्या मोबाईल ॲप्लीकेशनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या, जेनरीकार्ट मेडिसीन कंपनीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

     श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना महामारीच्या संकटकाळात जीवनावश्यक वस्तू तसेच औषधांची दुकाने वगळता इतर दुकाने बंद आहेत. जिल्ह्यात संक्रमितांचा आलेख वाढता असताना घरातून बाहेर पडणे अत्यंत धोक्याचे आहे. या पार्श्वभूमीवर जेनरीकार्ट मेडिसीन  ही कंपनी जेनेरिक औषधी गरजूंच्या घरपोच पोहचविते. हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. नागरिकांनी या मोबाईल ॲप्लीकेशनचा लाभ घ्यावा व घरीच औषधी बोलवून घ्यावीत. म्हणजे कोरोना संक्रमणाचा धोका टाळता येवू शकतो.

       जेनरीकार्ट मेडिसीन  कंपनी ही जेनेरिक व्यवसायातील  कंपनी आहे. कोविड संकटकाळात जास्तीत गरजू लोकांना घरपोच औषधे मिळावी, या उदात्त हेतूने मोबाईल ॲप्लीकेशन तयार करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती