तिवसा शहरात वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी पाच कोटी

नागरी सुविधांच्या महत्वपूर्ण कामांना चालना

-   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

             अमरावती, दि. 6 : _जिल्ह्यातील तिवसा शहरात विविध वैशिष्ट्यपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत नगरविकास विभागाकडून पाच कोटी रूपये निधी वितरीत करण्यात आला आहे.  त्यामुळे नागरी सुविधांच्या महत्वपूर्ण कामांना चालना मिळणार असून, जिल्ह्यातील इतरही शहरांसाठी लवकरच निधी मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली._

 

         जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामे आकारास यावीत, यासाठी पुरेसा निधी प्राप्त होण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा होत आहे. त्यानुसार तिवसा नगरपंचायतीसाठी पाच कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला असून, सिमेंट रस्ता, नाली बांधणे, सौंदर्यीकरण, हायमास्ट पथदिवे, रस्त्याचे काँक्रिटीकरण, लादीकरण अशी अनेक कामे त्यातून पूर्ण होणार आहेत.

 

        शहरातील सर्व परिसराचा विचार करून सर्व ठिकाणी पायाभूत सुविधांसह वैशिष्ट्यपूर्ण कामांना या निधीतून चालना मिळणार आहे व _शहराचा सर्वसमावेशक विकास_ साधला जाणार आहे. जिल्ह्यातील इतर शहरांसाठी विशेष अनुदान योजनेत वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी लवकरात लवकर निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.

 

       तिवसा शहरात प्रभाग दोनमधील सिमेंट रस्ता, प्रभाग 13 मध्ये दोन नाल्यांचे बांधकाम या कामांसाठी 22 लक्ष रूपये निधी वितरीत करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये सुरेश मोरघडे ते ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या घरासमोरील नालीचे बांधकामासाठी 10 लक्ष, तसेच भीमराव मेश्राम ते मधुकर खंगार यांच्या घरासमोरील नालीचे बांधकामासाठी 10 लक्ष, समर्थगेट गीर महाराज मंदिर परिसरात स्वयंपाकगृह बांधकामासाठी 13 लक्ष, प्रभाग क्रमांक 15 मधील सिमेंट रस्त्यासाठी 10 लक्ष, माणिकविहार येथील राजेंद्र वानखडे ते धनराज ठाकरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकामासाठी 10 लक्ष निधी वितरीत करण्यात आला आहे.

 

         प्रभाग क्रमांक 2 मधील धनराज ठाकरे ते श्री. नांदणे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकामासाठी व प्रभाग क्रमांक 14 मधील एसबीआय बँकेजवळील उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी 12 लक्ष निधी वितरीत करण्यात आला आहे. प्रभाग क्र. 2 मधील दोन सिमेंट रस्ते व प्रभाग 14 मधील एका नालीचे बांधकामासाठी 21 लक्ष निधी देण्यात आला आहे. प्रभाग 15 मधील नेमाडे सर यांच्या घरासमोरील खुल्या जागेचे सौंदर्यीकरण व कुंपणासाठी 10 लक्ष, प्रभाग 14 मधील नाली बांधकामासाठी 10 लक्ष, प्रभाग क्रमांक 11 मध्ये काँक्रिट नाली बांधकामासाठी 10 लक्ष निधी देण्यात आला आहे.

 

 

 

       प्रभाग क्रमांक 9 मध्ये हायमास्ट पथदिवे, प्रभाग क्र. 12 मध्ये नाल्याचा उतार काढणे, प्रभाग एकमध्ये कब्रस्तानात काँक्रिट रस्ता करणे यासाठी 13 लक्ष, प्रभाग तीनमध्ये काँक्रिट नालीसाठी 15 लक्ष, प्रभाग 5मध्ये  रोडसाईड लादीकरणासाठी व काँक्रिट रस्त्यासाठी 12 लक्ष, प्रभाग 14 मध्ये काँक्रिट रस्त्यासाठी 10 लक्ष, प्रभाग 15 व 16 मध्ये काँक्रिट रस्त्यासाठी 17 लक्ष, प्रभाग 13 मध्ये लादीकरणासाठी 10 लक्ष व जुनी ग्रामपंचायत ते नदीपर्यंत काँक्रिट नालीसाठी 10 लक्ष देण्यात येणार आहे.

 

      त्याचप्रमाणे, प्रभाग 2, 14, 15 मध्ये सौंदर्यीकरण, नाली बांधकाम, कुंपण भिंतीसाठी 24 लक्ष, प्रभाग 17 मध्ये काँक्रिट रस्ता, सभागृह बांधकामासाठी 20 लक्ष देण्यात आले आहे.

 

     त्याशिवाय, प्रभाग 12 मध्ये विहिरीला संरक्षणात्मक जाळी, प्रभाग 2 मध्ये सिमेंट रस्ता, प्रभाग एकच्या हिंदु स्मशानभूमीत काँक्रिट रस्ता, बाजार ओटा परिसरात रस्ता, पिंगळाई नदी घाटाजवळ अस्थी विसर्जन घाटाचे बांधकाम, प्रभाग क्रमांक 13 मध्ये गोविंदप्रभू महानुभाव सभामंडपाची दुरुस्ती आदी वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी मोठा निधी देण्यात आला आहे.

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती