तरुणांचे लसीकरण सुरू


तरुणांचे लसीकरण सुरू

ऑनलाईन नोंदणीनंतरच होणार लसीकरण

अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन

 

अमरावतीजि. 1 : 18 ते 44 वयोगटातील तरुणांच्या लसीकरणाला आजपासून आरंभ झाला. जिल्हा रुग्णालयातील ज्येष्ठ नागरिक वॉर्डातील लसीकरण केंद्रात अमरावतीच्या रसिका खाटके या 24 वर्षीय तरुणीने प्रथम लस घेतली.

        या लसीकरणासाठी अमरावती जिल्ह्याला साडे सात हजार लस प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयाचा ज्येष्ठ नागरिक वॉर्डडॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयमहापालिकेच शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रवरुड ग्रामीण रुग्णालय व अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुरुवातीच्या टप्प्यात लसीकरण होणार आहे. त्यातील अमरावती शहरातील ३ केंद्रावर आज युवकांचे लसीकरण सुरू झाले. उर्वरित दोन केंद्रावर उद्यापासून लसीकरण सुरू होईल. कोविन ॲपवर नोंदणीकृत तरुण गटातील व्यक्तींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर लसीच्या पुरवठ्यानुसार लसीकरणाचा विस्तार करण्यात येईलअसे डॉ. विनोद करंजीकर यांनी सांगितले.

ऑनलाईन नोंदणीनंतरच होणार लसीकरण

या वयोगटातील नागरिकांनी www.cowin.gov.in या संकेतस्थलावर नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर लसीकरणाचा दिनांक व वेळ कळवली जाईल. तसा संदेश संबंधिताला प्राप्त होईल. त्यामुळे कुणीही नोंदणी न करता थेट येऊन लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. विनानोंदणी लसीकरण होणार नाही. लसीकरणाबाबत नवी केंद्रे  आदींबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येतीलअसे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती