जिल्हाधिका-यांकडून नियोजन व खर्चाचा आढावा


अमरावती, दि. 4 : विविध विभागांना प्राप्त असलेला निधी मुदतीत खर्च करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी आज येथे दिले.
 जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात बैठक घेऊन जिल्हाधिका-यांनी विविध कामांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, धारणी येथील आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक नियोजन अधिकारी राजू ढोकणे, सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून  यांच्यासह विविध विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
 श्री. देशमुख म्हणाले की, सर्व विभागांनी विकासकामांसाठी प्राप्त निधी मुदतीत खर्च करावा. लवकरच पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत  बैठकीतून नियोजन, विकासकामे व खर्चाचा आढावा घेतला जाईल. त्यासाठी परिपूर्ण माहिती सादर करावी. जी कामे प्रलंबित राहिली आहेत, ती तत्काळ पूर्ण करावीत. आवश्यक मान्यता आदी बाबींचा तत्काळ पाठपुरावा करावा. धारणी येथील आदिवासी विकास प्रकल्पाच्या कामांचाही आढावा त्यांनी घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती