पालकमंत्री प्रविण पोटे दि.25 ते 28 ऑगस्ट पर्यत   
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
            अमरावती, दि.24 (जिमाका): अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळुन) राज्यमंत्री प्रविण पोटे हे दि.25 ऑगस्ट ते  28 ऑगस्ट 16 पर्यंत अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा तपशिल दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            दि.25 ऑगस्ट, 16 रोजी मुंबई येथून सकाळी 6 वाजता बडनेरा रेल्वे स्टेशनवर आगमन व राठीनगर निवासस्थान कडे प्रयाण. सकाळी 6-30 वाजता निवासस्थान येथे आगमन व राखीव. सकाळी 10-30 वा. राठीनगर येथून धामणगाव रेल्वे कडे प्रयाण व सकाळी 11.30 वा. धामणगाव रेल्वे येथे महाराजस्व अभियान कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वा. धामणगाव रेल्वे येथुन अमरावतीकडे प्रयाण करतील. दुपारी 3 वा. स्थानिक विविध कार्यक्रमांना भेटी व सोयीनुसार राठीनगर येथे आगमन व राखीव.
            दि.26 ऑगस्ट, 16 सकाळी 10-30 वा. राठीनगर येथून नांदूरा ता.जि.अमरावतीकडे प्रयाण व सकाळी 11 वा. नांदूरा येथील गोकुलम गोरक्षण संस्था येथे पशुसंवर्धन विभागाच्या कार्यशाळेचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12-30 वा. मेघे कॉलेज, बडनेरा रोड अमरावती येथे पदवीधर कार्यशाळेचे उद्घाटन. दुपारी 1-30 वा. अमरावती येथुन अकोला कडे प्रयाण करतील. दुपारी 3 वा. एमआयडीसी 4, सिद्धार्थ सोयाजवळ अकोला येथे औद्योगिक प्रदर्शनीचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायं 6 वा. अकोला येथुन अमरावतीकडे प्रयाण व रात्री 8 वा. राठीनगर निवासस्थान येथे आगमन व राखीव
            दि.27 ऑगस्ट, 16 सकाळी 10-30 वा.  राठीनगर येथून येनस, ता. नांदगांव खंडेश्वर, जि.अमरावतीकडे प्रयाण व सकाळी 11-30 वा. येनस येथे विकासाची नवी झेप या उपक्रमातंर्गत एका विशेष जनसंवाद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वा. पापड, ता. नांदगाव खंडेश्वर येथे महाराजस्व अभियान कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वा. पापड येथुन अमरावतीकडे प्रयाण व दुपारी 2-30 वा. राजापेठ येथील भाजपा कार्यालय येथे ओ.बी.सी. सेलच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 3 वा. अमरावती येथून शेंदुरजनाघाट ता.वरुड कडे प्रयाण व सायं 5 वा. शेंदूरजनाघाट येथील रस्त्यांचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायं. 7 वा. शेंदूरजनाघाट येथून अमरावतीकडे प्रयाण व रात्री 9 वा. राठीनगर निवासस्थान येथे आगमन व राखीव.  
दि. 28 ऑगस्ट, 16 सकाळी 10-40 वा. राठीनगर येथून मोतीनगर कडे प्रयाण व सकाळी 11 वा. मोतीनगर येथील न्यु गोल्डन इंग्लिश स्कूल येथे आयोजित जनता दरबार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वा. बडनेरा रोड येथील जाधव पॅलेस येथे भाजपा साईमंडळ मेळाव्यास उपस्थिती. सायं 5 वा. बडनेरा येथील महावीर भवन येथे आयोजित बडनेरा भाजपा मेळाव्यास उपस्थिती. सायं. 7-57 वा. बडनेरा रेल्वे स्टेशन येथे आगमन व विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000

गावंडे/कोल्हे/24-08-2016/15-40 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती