Saturday, September 10, 2016

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज
विनामुल्य महाआरोग्य शिबिर आयोजनाची पुर्वतयारी सभा
* सभेस वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी हजर राहण्याचे आवाहन
            अमरावती, दि.7 (जिमाका) : अमरावती जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुर, दारिद्रयरेषेखालील व गरजु कुटूंबातील रुग्णांसाठी विनामुल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन प्रस्तावित आहे.
            या विनामुल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजनाबाबतची पुर्वतयारी सभा पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.8 सप्टेंबर, 16 रोजी बचत भवन अमरावती येथे दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
            या सभेस वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी आपला पुढाकार घेवून सभेस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अरुण राऊत यांनी केले आहे.
                                                                        00000

काचावार/गावंडे/दि.07-9-2016/13-55 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...