Saturday, September 10, 2016

विद्यार्थ्यांनी युपीएससी एमपीएसी कडे वळावे
पालकमंत्री प्रविण पोटे
* माहुली जहागिर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

          अमरावती, दि.3 (जिमाका): विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनिअर यासारख्या पारंपारिक नोकऱ्यांकडे न वळता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअर घडवावे. गुणवंत विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) व राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) या परीक्षा देवून दर्जेदार प्रशासकीय अधिकारी म्हणून कारर्किद घडवावी व व्यवस्थेला बदलविणारे शिलेदार म्हणून पुढे यावे असे आवाहन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी माहुली जहागिर येथे केले.

          स्व.सौ.हिराबाई तुळशीराम गुल्हाने चारिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष प्रा.दिनेश सुर्यवंशी, शहर अध्यक्ष जयंत डेहणकर, निवेदिता चौधरी उपस्थित होते. 

          यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. शिक्षणाशिवाय बदल होणार नाही म्हणून उच्च शिक्षणाचा ध्यास विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. आधी ध्येय निश्चितीकरण व त्या ध्येयासाठी जिद्दीने काम केल्यास युपीएससी सारख्या परीक्षा देखील यश मिळवता येते. यावेळेस त्यांनी अब्दुल कलामांचा आदर्श घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. यावेळेस त्यांनी जनहितार्थ योजनांच्या माहिती रथ प्रचाराचा प्रारंभ केला. जिल्ह्यात 2 लाख 40 हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ दिला असुन वीजेचे कनेक्शनमध्ये जिल्ह्यात शुन्य प्रलंबितता आणण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. पशु विमा योजना, पीक विमा योजना, शेतीला पुरक व्यवसाय यामुळे शेतकऱ्यांना मदतच झाली आहे. मागेल त्याला शेततळे, वीज, पाणी हा शासनाचा प्राधान्यक्रम आहे.

          श्वेता ठाकरे, आसमा परविण, मुमताज अहमद, संघवीर खंडारे, प्रगती इंगोले, बिपीन जाधव, मुस्कान बानु, नाजिया बानु, गौरव तायडे, आदी यासह 40 गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थींचा सत्कार करण्यात आला.
                                                          00000

वाघ/गावंडे/सागर/03-09-2016/15-45 वाजता




No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...