प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रासाठी प्रवेश परीक्षा प्रक्रिया सुरु
       अमरावती,दि.29 (जिमाका): भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे प्रवेश परीक्षेची प्रक्रिया सुरु झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2017 पूर्व परीक्षेसाठी पात्रता धारक कोणत्याही पदवी धारकास ही प्रवेश परीक्षा देता येईल.
            विद्यार्थ्यांना वेबसाईट वर दि.3 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या दरम्यान प्रवेश अर्ज भरता येईल. 9 ऑक्टोंबर रोजी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या द्वारे गुणवत्तेनुसार 60 विद्यार्थी, 10 विद्यार्थी अनुसुचित जाती असे एकुण 70 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. या 70 विद्यार्थ्यांपैकी जे पूर्व परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांना मुख्य परीक्षा तयारीचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच मुलाखतीची तयारी करुन देण्यात येईल. संपर्क क्रमांक 2530214, 2190442 यावर संपर्क करता येईल. प्रशिक्षण विनामुल्य आहे. प्रति महिना 2 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल. याशिवाय ग्रंथालय, संगणक कक्ष, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या वस्तीगृहात राहण्याची सुविधा या सुविधा उपलब्ध राहतील. अशी माहिती केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. मुरलीधर वाडेकर यांनी दिली आहे.
00000
वृत्त क्र.903                                                         दिनांक 29-08-2016
चर्मकार समाजातील मुलामुलींसाठी प्रशिक्षण योजना
*प्रशिक्षण संस्थाकडुन प्रस्ताव आमंत्रित
       अमरावती,दि.29 (जिमाका): संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्याकडुन चर्मकार समाजातील पात्र मुला-मुलींना व्यावसायिक कौशल्य वाढविण्यासाठी प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाकडुन प्रस्ताव मागविण्यात येत आहे.  
            संस्थेस व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय यांची मान्यता असावी, संस्था पाच वर्षापासुन कार्यरत असावी, संस्थेचे गेल्या तीन वर्षाचे ऑडीट झालेले असावे, ट्रेडनिहाय प्रशिक्षणासाठी प्रशस्त जागा व कर्मचारी वर्ग असावा. प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण देणाऱ्यांपैकी 30 टक्के महिला प्रशिक्षक असणे आवश्यक आहे. अधिक माहिती साठी सामाजिक न्याय भवन येथील संत रोहिदास चर्मोद्योग कार्यालयाशी दुरध्वनी क्रमांक-2551496 संपर्क साधावा. प्रशिक्षण संस्थानी 5 ते 13 सप्टेंबर 16 या दरम्यान प्रस्ताव सादर करावे. प्राप्त झालेल्या संस्थेच्या प्रस्तावाची स्थल पाहणी 15 सप्टेंबर पर्यत जिल्हा व्यवस्थापक करतील व त्याचा अहवाल प्रधान कार्यालय मुंबई येथे पाठविण्यात येईल, असे जिल्हा व्यवस्थापक लीडकॉम अमरावती यांनी कळविले आहे.
                                                                        00000


वाघ/कोल्हे/दि.29-08-2016/17.10 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती