आरोग्य विभागातील वैद्यकिय अधिकाऱ्यांची रिक्त पदे लवकरच भरणार
जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा
          अमरावती, दि.31 (जिमाका) : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत आरोग्य विभागातील रिक्त पदांची पदभर्ती लवकरच करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आढावा बैठकीत सांगितले. नुकतेच शासन स्तरावरुन वैद्यकिय अधिकाऱ्यांची भर्ती जिल्हा स्तरावर करण्याबाबतच्या सुचना मिळालेल्या होत्या
          जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुळकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन भालेराव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, डॉ. माने यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती घेतली. आरोग्य विभागात यावर्षी शासनाच्या आदेशानुसार 34 रिक्त पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार बालरोगतज्ञांची 8, स्त्रीरोग तज्ञ 5, अस्थीव्यंग तज्ञ 3, भुलतज्ञ 1, फिजीशीयन 1, नेत्रतज्ञ 1, शरीर विकृती शास्त्रतज्ञ 1, वैद्यकिय अधिकारी साथरोग 1, व वैद्यकिय अधिकारी औषधशास्त्र 2 या पद्धतीने आरोग्य यंत्रणेतील तज्ञ डॉक्टरांची भर्ती करण्यात येणार आहे. सर्जन सारख्या काही पदांसाठी योग्य उमेदवार मिळाले नाहीत.
          राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा स्तरावर डॉक्टरांची भर्ती करण्याचा शासन निर्णय 29 फेब्रुवारी ला निघाला होता. त्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी तातडीने कार्रवाई करुन मे महिन्यामध्ये मुलाखती व जुलै महिन्यामध्ये अंतिम यादी शासनाकडे मान्यतेसाठी पाठविली. मान्यता प्राप्त झाल्यानंतर तातडीने ही पदे भरण्यात येणार आहे. याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. जिल्ह्यातील एकुण 70 वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांपैकी 34 विशेषज्ञांची पदे भरल्यानंतर उर्वरीत वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या भर्तीची प्रक्रिया देखील गतिमान पद्धति ने राबविण्यात येणार आहे.
00000
वाघ/कोल्हे/दि.31-08-2016/18-50 वाजता



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती