चिखलदरा व धारणी तालुक्यातील 17 गावांत
रास्तभाव दुकान मंजुरीसाठी
जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
            अमरावती दि.2 (जिमाका): शासन आदेशानुसार रास्तभाव दुकाने स्वयं सहाय्यता महिला बचत गटांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के वानखडे यांनी चिखलदरा व धारणी तालुका क्षेत्रातील 17 गावांकरीता दि. 3 ते 17 सप्टेंबर 16 दरम्यान संबंधितांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.   
            दि. 3 ते 17 सप्टेंबर 16 दरम्यान चिखलदरा तालुक्यातील सुमिता, कुटीदा, कामनापुर, माखला, भिलखेडा, जामली आर, खोंगडा, बोरी, टेटु, शहापुर, टेंब्रुरसोंडा, पांढरा खडक, रामटेक, मेमना, आमझरी तसेच धारणी तालुक्यातील रोरा, अंबाडी या गावांमध्ये ही रास्तभाव दुकान मंजुरीसाठी स्वयं सहाय्यता बचत गटांकडुन अर्ज स्वीकारण्यात येतील. संबंधीत बचतगट कार्यालयीन वेळेत चिखलदरा व धारणी तहसील कार्यालयातुन अर्ज प्राप्त करु शकतात.
            जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दिशानिर्देशानुसार ज्या गावासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याच गावातील स्वयं सहाय्यता महिला बचत गटांना अर्ज करता येणार आहे. स्वयं सहाय्यता बचत गटाची निवड करतांना महिला स्वयं सहायता गटांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. महिला बचत गट उपलब्ध न झाल्यास पुरुष बचत गटांना प्राधान्य देण्यात येईल. जेष्ठ व वर्धनक्षम व नियमित गटांचा निवडीदरम्यान विचार करण्यात येणार आहे. रास्त भाव दुकान परवाना मंजुर करण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती द्वारे करण्यात येईल.  समिती समक्ष परवाना मंजुरीसाठी येणारे प्रस्ताव महिला ग्रामसभेसमोर विचारार्थ व शिफारशीसाठी ठेवण्यात येईल. महिला ग्रामसभेच्या शिफारशीनुसार प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे.
            जे स्वयं सहाय्यता महिला बचत गट रास्तभाव दुकाने मंजुरी साठी प्रस्ताव सादर करु इच्छितात त्यांना विहित नमुन्यात बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव, अथवा सदस्याचा रहिवाशी दाखला, बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, बचत गटाचे आर्थिक स्थिती बाबतचे कागदपत्र जसे-बँक पासबुक इत्यादी., व्यवसाय करावयाच्या जागेची मालकी बाबत मुळ कागदपत्र, जागा भाड्याची असल्यास 100 रुपयाचे स्टॅम पेपर करारनामा, भाडेपत्र, घरटॅक्स पावती, 7/12 व्यवसाय ठिकाणाचे क्षेत्रफळ चौ. फुट मध्ये, बँकेकडुन घेतलेल्या कर्जाचे व परतफेडीचे प्रमाणपत्र, गटाने घेतलेल्या कर्ज व परतफेड बाबत विवरणपत्र सन. 2014-15, 2015-16 पर्यत., बचत गटाचे मागील तीन वार्षिक लेखे व हिशोब सन 2013-14 ते 205-16 पर्यत तपासणी केलेल्या विहित संस्थेचा अहवाल, बचत गटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सहित सर्व सदस्यांची नावे व संपुर्ण पत्ता, बचत गटाचे मुळ व आजचे भाग भांडवल तसेच सध्या करीत असलेला व्यवसाय व ज्या कार्यालयामार्फत व्यवसाय करीत आहे त्या कार्यालयाची संपुर्ण माहिती व पत्ता, परवाना मिळण्याबाबत व व्यवसाय करण्याबाबत संमती दर्शविलेल्या गटाचा ठराव, बचत गट स्वत: एकत्रितरित्या परवाना चालविल आणि कोणत्याही इतर व्यक्तीस किंवा संस्थेला चालविण्यास देणार नाही किंवा हस्तांतरीत करणार नाही, याबाबत सर्व सदस्यांचे एकत्रितरित्ये प्रतिज्ञात्र (कार्यकारी दंडाधिकारी यांचेकडून साक्षांकित केलेला ) मुळप्रति सहित कागदपत्र सादर करावे लागेल.
            जास्तीत जास्त स्वयं सहायता महिला बचत गटांनी मेळघाट भागात रास्त दुकान मंजुरीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे यांनी केले आहे.
00000

काचावार/वाघ/कोल्हे/दि.02-9-2016/18-39 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती