प्रत्येक तालुक्यात पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय उभारणार-
पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकर
*पोळयाच्या शुभमुहुर्तावर 1 कोटी 51 लक्ष कीमतीच्या
अचलपुर तालुका लघु पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालयाचे लोकार्पण
            अमरावती दि.1 (जिमाका): अचलपुर येथे बांधलेल्या अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालया प्रमाणे येणाऱ्या काळात प्रत्येक तालुक्यात पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय उभारणार असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेवराव जानकर यांनी केले.
            पोळ्याच्या शुभमुहुर्तावर अचलपुर येथे तालुका लघु पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय येथे बिगर निवासी इमारतीच्या लोकार्पण सोहळयात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बच्चु कडु, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पंचायत समिती अचलपुरचे उपसभापती गजानन भोरे, प्रादेशीक सह आयुक्त पशुसंवर्धन डा. पी. एस. चव्हाण, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. ए. आर. हजारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद डॉ. पी. व्ही. सोळंके उपस्थित होते.
            शेतकऱ्यांना, गोपालकांना पशुवैद्यकिय चिकित्सालयात अद्यावत सोई सुविधा उपलब्ध झाल्याने पुढील काळात पशु संवर्धनासाठी मदत होईल. राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळातर्फे विदर्भ व मराठवाड्यात 2500 कोटी रुपयाच्या पैकेज मधुन दुग्ध संवर्धनासाठीच्या योजना राबवुन शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. संपुर्ण राज्यात पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागात 2200 रिक्त पदांची भर्ती लवकरच करण्यात येईल. असे त्यांनी सांगितले. विदर्भातील लोकांनी सबसिडी पेक्षा प्रकल्पावर लक्ष्य केंद्रीत करुन काम केल्यास शेतकरी आत्महत्या कमी होतील. शेतकऱ्यांना जोड़ धंदा म्हणुन पशुसंवर्धन व दुग्धविकास याला पुरक अशी यंत्रणा पशुचिकित्सालय उभारुन करता येईल. पशुचिकित्सालयामधुन शेतकऱ्यांना पशुची निगा, आजार, शेतकरी प्रशिक्षण अशा सुविधा पुरवता येतील. आमदार बच्चु कडूंचा उल्लेख अपंगांसाठी कार्य करणारा एकमेव माणुस अशा शब्दात मंत्री जानकरांनी उल्लेख केला.
राज्यभरात पशु पीक विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असुन 1 ते 15 ऑगस्ट या पंधरवाड्यात अचलपुर तालुक्यात 92 लाख कीमतीचा पशुविमा काढण्यात आल्याचे अचलपुर येथील सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. विजय रहाटे यांनी सांगितले. या पशुवैद्यकिय संस्थेद्वारे औषधोपचार व शस्त्रक्रिया, कृत्रिम रेतन द्वारे पशुपैदास, रोगनिदान करण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर, शासकीय योजनांची पशुपालकांना माहिती उपलब्ध करुन अमलबजावणी करणे, वैरण विकास कार्यक्रम राबविणे यासारखे कार्य केले जाणार आहे.
            अत्याधुनिक पशुचिकित्सालयाद्वारे शेतकऱ्यांना मदत होणार असुन या पशुचिकित्सालयात अतिरिक्त कर्मचारी देण्याची मागणी आमदार बच्चु कडु यांनी केली. रासायनिक खताप्रमाणे शेणखताला सबसिडी व चांदुर बाजार तालुक्यात अन्य सर्वपशुचिकित्सालय देण्याची मागणी त्यांनी केली.
            जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी देखील या पशुचिकित्सालयात येणाऱ्या पशुपालकांना चांगली सेवा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पशुधन विमा योजनेतंर्गत पॉलीसी धारकांना पॉलीसी वाटप करण्यात आली. यामध्ये शिवराम कोकरे, नंदु कोकरे, साहेबराव गोरे, मदन तिडके, काशीनाथ कोकरे, गंगाराम दहिथे, सदाशिव कोकरे यांना पॉलीसी वाटप करण्यात आल्या. सा. बा. वि चे कार्यकारी अभियंता भावे यांना मंत्री महोदयांच्या वतीने प्रशस्ती पत्र देण्यात आले.  
            सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. विजय रहाटे यांनी या चिकित्सालयामार्फत आजुबाजुच्या 13 दवाखान्याना सेवा पुरविण्यात येणार आहे. प्रास्ताविक प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन डॉ. पी. एस. चव्हाण यांनी तर संचालन व आभार प्राजक्ता राऊत यांनी केले. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उदय पुरी सहित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
*पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालयाची वैशिष्ट्ये व कार्ये
*इमारत बांधकामासाठी 1 कोटी 51 लक्ष्य खर्च
*अत्याधुनिक व सुसज्य इमारत
*पशुंसाठी एक्स रे मशीन, पशुंसाठी ब्लड एनालाईजर, बायोकेमिकल एनालाईजर, सोनोग्राफी, *लसीकरण केंद्र
*मंजुर पदे 5
00000

वाघ/कोल्हे/राजपुतदि.01-9-2016/18-15 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती