Saturday, September 10, 2016

फोटोग्राफी प्रशिक्षणार्थींनी दिली
वडाळी येथील बांबु पर्यटन केंद्राला भेट

शासकीय तंत्रनिकेतनचा अभिनव उपक्रम

       अमरावती, दि.20 (जिमाका): शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरु असलेल्या तांत्रिक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत डिजीटल फोटोग्राफी व व्हिडीओ-ग्राफीचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी आऊट डोअर फोटोग्राफीचा आनंद लुटला. प्रशिक्षणार्थींनी वडाळी येथील बांबु पर्यटन केंद्राला नुकतीच भेट देऊन तेथील सौंदर्य आपल्या कॅमेरात कैद केले.
मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली पुरस्कृत कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्नीक योजना शासकीय तंत्रनिकेतन येथे राबविण्यात येत आहे. तांत्रीक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत डिजीटल फोटोग्राफी व व्हिडीओ-ग्राफीचे तीन महिने कालावधीचे प्रशिक्षण दिले जात आहे. या माध्यमातुन कौशल्य विकास यासोबतच प्रत्यक्ष निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी प्रशिक्षणार्थींना दिली जाते. हाच उद्देश्य समोर ठेऊन प्रशिक्षणार्थ्यांना आऊट डोअर फोटोग्राफीची संधी देण्यात आली.   
वडाळी येथील बांबु पर्यटन केंद्रातील निसर्गरम्य परिसर, अत्यंत मनमोहक होता. वडाळी पर्यटन स्थळाचा निसर्गरम्य परिसर, अथांग जलाशय, पहाड, रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली बाग अशा निसर्गरम्य दृष्याचे छायाचित्र घेवून प्रशिक्षणार्थ्यांनी प्रात्यक्षिकाचे धडे गिरविले. यावेळी प्रशिक्षक अनंत जामोदकर यांनी पक्षी आणि फुलांच्या विविध छटा कॅमेरात कशा टिपाव्या याचे बारकावे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप डहाके, प्रवीण गडकर, निलेश जुनघरे, विनोद कदम ने अथक परिश्रम घेतले. याशिवाय कम्युनिटी डेव्हलमेंट योजनेते समन्वयक प्रा. एस. जे. गायकवाड व संस्थेचे प्राचार्य डी. एन. शिंगाडे यांचे मार्गदर्शन लाभले.  

                                                                        00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...