Saturday, September 3, 2016

एनपीएस प्रशिक्षण 23 ऑगस्ट पासुन

       अमरावती, दि.22 (जिमाका): वरिष्ठ कोषागार कार्यालयातर्फे जिल्हा स्तरावर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरीता 23 ते 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत सहसंचालक कार्यालय, लेखा-कोष भवन, विद्यापीठ रोड, अमरावती येथे प्रशिक्षण आयोजित केले आहे.
          यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व त्यांचे फायदे, सेवानिवृत्ती नंतरचे लाभ, आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी करायची विस्तृत कार्यपद्धती, प्राण कीटचा वापर, कर्मचाऱ्यांच्या माहिती दुरुस्ती करण्यासाठी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात आहरण व संवितरण अधिकारी, वेतन देयक लिपीक व एनपीएस बाबत माहितीगार कर्मचारी यांनी उपस्थित राहावे. आहरण अधिकाऱ्यांनी सीएसआरएफ फार्मची माहिती सोबत आणावी. हे प्रशिक्षण महत्वाचे असून यासाठी संबंधितांनी उपस्थित रहावे, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी व्यं. व. जोशी यांनी कळविले आहे. 
                                                                        00000

काचावार/कोल्हे/दि.22-08-2016/19.00 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...