सोयाबीन पीक पाहणी करुन शेतकऱ्यांना दिले मार्गदर्शन
       अमरावती, दि. 24 : किड रोग सर्वेक्षण व सल्ला (क्रॉपसॅप) प्रकल्प कृषि विभागांतर्गत पद्मश्री विट्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त कापुसतळणी येथे सोयाबीन पीक पाहणी करण्यात आली. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी अनिल खर्चान यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावरील विविध किडींची ओळख व नियंत्रणात्मक उपाय याविषयी मार्गदर्शन केले.
          कापुसतळणी येथील नरेश रामटेके यांच्या शेतातील सोयाबीन पीकाची पाहणी करण्यात आली असता त्यावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आला. केवळ नरेश रामटेके यांच्या शेतातच नाही तर परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या शेतात खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे शेतकऱ्यांची सभा घेऊन त्यांना खोडमाशी नियंत्रणाकरीता उपाय योजना सांगण्यात आल्या. याशिवाय सोयाबीन पिकावर येणाऱ्या विविध किडींची ओळख व नियंत्रणात्मक उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
          उपविभागीय कृषि अधिकारी अनिल खर्चान यांनी खोडमाशी नियंत्रणासाठी इन्डोक्साकार्ब 16.5  टक्के प्रवाही 7 मि.ली. 10ली. पाण्यात किंवा कोरायजन 3मि.ली.प्रति 10ली. पाण्यात किंवा इथीऑन 20मि.ली. प्रति 10ली. पाण्यात याप्रमाणे एका किटकनाशकाची फवारणी केल्यास शेतकरी आपल्या पिकास वाचवू शकतो असे ही ते म्हणाले.
          पाहणी दौऱ्यादरम्यान तालुका कृषि अधिकारी गोंधळे, कीड नियंत्रक वैशाली वानखडे, राहुल देशमुख, कृषि सहाय्यक शारदा पांडे, कीड सर्वेक्षक आशीष मने, कु.प्रियंका ढोरे प्रामुख्याने उपस्थित होते. गावकरी-शेतकरी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

गावंडे/कोल्हे/दि.24-8-2016/18-20 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती