Saturday, September 3, 2016

शिष्यवृत्ती योजनेची रक्कम आधारद्वारे करण्याबाबत प्राचार्यांना सुचना
          अमरावती, दि.26 (जिमाका) : ई-स्कॉलरशीप योजनेतंर्गत मॅट्रीकोत्तर भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी अंतर्गत ऑनलाईन करण्यात आलेल्या सर्व योजनेचे प्रदान या पुढे आधार बेस पेमेन्ट द्वारे करण्यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संकलन करावे. नंतर त्याचे एक महिण्याच्या आत वैधताकरण करुन घ्यावे. विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक त्यांच्या बॅंक खात्याशी लींक झाला आहे किंवा नाही हे resident.UIDAI.net.in या पोर्टल वर जाऊन खात्री करावी. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी ई-स्कॉल पोर्टल मध्ये आधार कार्ड क्रमांकाची माहिती दिली असेल तर तो वैध असल्याची खात्री करुन घ्यावी.
          विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता वेळेत व लवकर मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक वैध असणे व बँक खातेशी संलग्न असणे आवश्यक आहे. ही बाब विद्यार्थी व पालकांना सांगण्यात यावी. प्राचार्यांनी याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी असे सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी कळविले आहे.
           
00000
कायदेविषयक शिबीर संपन्न
          अमरावती, दि.26 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मानवाधिकार संशोधन संघठना यांच्या संयुक्त विद्यमाने महानगर पालिका सभागृहात कायदे विषयक शिबीर संपन्न झाले. यावेळी शिक्षणाचा अधिकार, महिलांचे अधिकार, जलव्यवस्थापन व कामगार कायदा व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
          प्रास्ताविक एम. ए. कोठारी, जिल्हा प्राधिकरणाचे एस. एस. ओझा यांनी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. न्या. कनिष्ठ स्तर सौ. जी. व्ही. जांगडे यांनी महिलांच्या अधिकाराबाबत माहिती दिली. पी.डी. भामरे कार्यकारी अभियंता मजीप्रा यांनी जलव्यवस्थापना बाबत विचार मांडले. अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधिश 5 विमलनाथ तिवारी होते. नगर सेविका कांचन ग्रेसपुंजे, उपायुक्त नरेंद्र वानखडे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन शीतल तिडके तर आभार अमोल शिंगाडे यांनी मानले.
                                                          00000
वाघ/कोल्हे/दि.26-08-2016/18-10 वाजता


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...