Saturday, September 3, 2016

दिव्यांगजन व्यक्ति राष्ट्रीय पारितोषीकासाठी नामाकंन मागविणेबाबत
          अमरावती, दि. 26 : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व दिव्यांगज सक्षमीकरण मंत्रालय, नवी दिल्ली यांचया व्दारे आंतरराष्ट्रीय अपंग दिनांच्या निमीत्याने दि. 3 डिसेंबर ,2016 रोजी राष्ट्रीय पारितोषिक देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या संदर्भात विविध वर्गवारी मधुन दिव्यांग व्यक्तिींना पारितोषीक देण्याचे प्रास्तावित आहे. करीता दि. 26 ऑगस्ट, 2016 पर्यंत प्रस्ताव पुरस्कार नामांकनासाठी मागविण्यात येत आहे. संबंधित व्यक्तिीनी आपले प्रस्ताव जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय अमरावती या ठिकाणी आवश्यक त्या सर्व का्रदपत्रांसह सादर करणयबाबत कळविण्यात येत आहे. असे जिल्हा क्रिडा अधिकारी अमरावती यांनी आवाहन केले आहे. अधिक माहिती व विहीत नमुना अर्जाकरीता www.disabilityaffairs.gov.in या वेबसाईटचा उपयोग करावा

00000
प्रादेशिक सेनेत भर्तीची सुवर्णसंधी
          अमरावती, दि. 26 : 118 इनफेन्ट्री बटालियन प्रादेशिक सेना कार्यालय तर्फे सेना भरतीचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यानुसार पात्र व इच्छुक उमेदवारांनी 118 इनफेन्ट्री प्रादेशिक सेना किल्ला सिताबर्डी नागपुर येथे 4 सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी 6 वाजता भर्तीसाठी उपस्थित राहावे. उमेदवाराचे वय 18 ते 42 वर्षा दरम्यान असावे. उंची 160 से. मी वजन 50 किलो ग्राम आणि छाती 77 सेमी अधिक 5 सेमी फुगून असावी.
          सोल्जर जनरल ड्युटी करीता इयत्ता 10 वी च्या परिक्षेत कमीत कमी 45 टक्के मार्क आणि प्रत्येक विषयात 35 टक्के मार्क असावे. सोल्जर शेफ साठी 10 पास असणे आवश्यक आहे. सोल्जर क्लर्कसाठी 10+2 पास आणि एकूण 50 टक्के मार्क्स आणि प्रत्येक विषयात 40 टक्के मार्क्स असणे जरुरीचे आहे. उमेदवारांच्या अंगावर गोंदवलेले नसावे.
          भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. उमेदवाराने खालील मूळ प्रमाण पत्रासह, राजपत्रीत अधिकाऱ्यांकडून सर्व प्रमाणपत्रांच्या दोन साक्षंकित केलेल्या छायांकिंत प्रति आणाव्यात. रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणत्र, खेळातील प्राविण्य असल्यास प्रमाणपत्र, तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केला आहे.
000000



वाघ/कोल्हे/दि.26-08-2016/18.00 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...